Wednesday, October 7, 2026
Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू,नऊ जखमी ; पोंभुर्णा, मूल आणि ब्रह्मपुरी...

चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू,नऊ जखमी ; पोंभुर्णा, मूल आणि ब्रह्मपुरी तालुक्यांतील घटना

चंद्रपूर जिल्ह्यात वीज कोसळून दोघांचा मृत्यू,नऊ जखमी ; पोंभुर्णा, मूल आणि ब्रह्मपुरी तालुक्यांतील घटना

सुकदर्शन वृतांत 
चंद्रपूर : चंद्रपूर : जिल्ह्यात गुरुवारी (ता.17) दुपारी झालेल्या वादळी पावसादरम्यान वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला, तर नऊ जण जखमी झाले.पोंभुर्णा तालुक्यात शेतकऱ्याचा, तर मूल तालुक्यात गुराख्याचा मृत्यू झाला. ब्रह्मपुरी तालुक्यातील बरडकीन्ही येथे मिरचीच्या शेतात वीज कोसळून आठ जण जखमी झाले.
पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे शेतातून पत्नीसमवेत घरी परतत असताना वीज कोसळून केशव डोनु गुडी वय,55 वर्ष यांचा मृत्यू झाला.पत्नी वैशाली गुडी वय,45 वर्ष गंभीर जखमी झाल्या.त्यांना पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 
मूल तालुक्यातील उसराळा येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेले गुराखी दीपक नारायण मडावी (३५) यांच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकीन्ही गावाबाहेरील जनाबाई मारुती तलमले यांच्या शेतात मिरची लागवडीचे काम सुरू असताना वीज कोसळून आठ जण जखमी झाले.त्यात तलमले कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे. जखमींना आरमोरी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मनीषा गोकुळदास ठाकरे वय,22 वर्ष यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ब्रह्मपुरीतील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उर्वरित सात जखमींवर उपचार सुरू आहेत.
error: Content is protected !!