Tuesday, October 13, 2026
Home Chandrapur सावली वनपरिक्षेत्रांतर्गत 18 सप्टेंबर रोजी सावली येथे जागतिक बांबू दिवस साजरा 

सावली वनपरिक्षेत्रांतर्गत 18 सप्टेंबर रोजी सावली येथे जागतिक बांबू दिवस साजरा 

सावली वनपरिक्षेत्रांतर्गत 18 सप्टेंबर रोजी सावली येथे जागतिक बांबू दिवस साजरा 

सुकदर्शन वृतांत 
सावली : सावली वनपरिक्षेत्रांतर्गत 18 सप्टेंबर रोजी जागतिक बांबू दिनानिमित्त सर्वसामान्यापर्यंत बांबू लागवडीचे महत्त्व पोहोचविण्यासाठी वनपरिक्षेत्र सावली व बायोटेक ग्रीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक वन हक्क समितीचे पदाधिकारी, पंचायत समिती अंतर्गत VB G Ramji कर्मचारी, सरपंच, शेतकरी व वन कर्मचारी यांचे एक दिवशीय कार्यशाळा पार पडली. 
सदर कार्यशाळेत खालील प्रमाणे प्रमुख अतिथी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य मार्गदर्शकाच्या अनुभव व मार्गदर्शनातून सामूहिक वनहक्क समितीचे पदाधिकारी व इतर सरपंच आणि शेतकरी यांना निश्चितच आत्मविश्वास उंचावण्यास मदत झाली असून भविष्यामध्ये बांबू लागवडीला चालना मिळण्यासाठी या कार्यशाळेचा निश्चितच फायदा व लाभ होणार आहे. 
कार्यशाळेचे अध्यक्ष मा.सौ.प्रांजली चिरडे, तहसीलदार सावली,कार्यशाळेचे उद्घाटक मा.श्री मुक्तेश्वर कोमलवार,गट विकास अधिकारी,सावली प्रमुख मार्गदर्शक अन्नपूर्णा धुर्वे संचालिका, बांबूटेक ग्रीन सर्व्हिसेस, चंद्रपूर 
प्रमुख उपस्थिती – मा.ललित राऊत, तालुका कृषी अधिकारी सावली,मा.विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी सावली सदरच्या कार्यशाळेत लागवड करावयाची बांबू प्रजाती,व्यवस्थापन,निंदनी, हार्वेस्टिंग,मार्केटिंग आणि हस्तकला निर्मितीतून उत्पन्नात अधिकाधिक वाढ करून आर्थिक विकास या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या मार्गदर्शनातून गावाचा / ग्रामसभेचा शाश्वत विकासाबरोबरच वेगवान वाढणाऱ्या व कार्बन शोषक अशा बांबू लागवडीतून जल व मृद संधारण सोबतच पर्यावरण संतुलनास मदत होईल सर्वांगीण विकास साधण्यासाठी निश्चित प्रेरणादायी व लाभदायी ठरेल. आणि सावली तालुक्यातील मजुरांची रोजगारासाठी भटकंती कमी होईल,असा विश्वास विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांनी कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत नमूद केले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक विनोद धुर्वे वनपरिक्षेत्र अधिकारी सावली, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राजू मुरकुटे वनरक्षक चकपिरंजी तर आभार प्रदर्शन V.B.G – Ramji विभागाचे श्री भोयर यांनी केले.
error: Content is protected !!