सर्पमित्र रजत मदनकर यांनी दिले आठ फुट अजगराला जीवदान
सुकदर्शन वृतांत
ब्रम्हपुरी- १८/०९/२६ (अमरदीप लोखंडे,सहसंपादक) ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील दोन्ही पायांनी अपंग असलेल्या दामू चंडीकार यांनी पोटाच्या उदरनिर्वाहासाठी गावाबाहेर वाहणाऱ्या नालीमध्ये मच्छी पकडण्यासाठी मांडलेल्या कोत्र्यात रात्रीच्या सुमारास अजगर पडला असावा.सकाळी कोत्र्यातील मच्छी बाहेर काढण्यासाठी गेले असता त्यात त्यांना अजगर दिसला.
लगेच त्यांनी गावात येऊन घटनेची माहिती पोलीस पाटील अकुल राऊत, तंटामुक्ती अध्यक्ष होमराज राऊत व गावकऱ्यांना दिली. लगेच पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष व गावकरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. लांबलचक असलेला कोत्र्याचा जाळ कापून जाळात बांधून त्यांनी अजगराला गावातील बाजार चौकात आणले. अजगराला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.
सर्पमित्र रजत मदनकार ब्रम्हपुरी यांना बोलविण्यात आले असता त्यांनी अजगराला पोतली मध्ये भरून ब्रम्हपुरी परिसरातील जंगलामध्ये नेऊन सोडून जीवदान दिले.
error: Content is protected !!