Tuesday, October 13, 2026
Home Chandrapur वैभव मेश्राम BROमध्ये ऑल इंडिया रँक मध्ये पहिला व व्हेहिकल मेकॅनिकल मध्ये...

वैभव मेश्राम BROमध्ये ऑल इंडिया रँक मध्ये पहिला व व्हेहिकल मेकॅनिकल मध्ये देशातून ३७ वा.  दोन यश संपादन केल्यामुळे अभिनंदनचा वर्षाव.

वैभव मेश्राम BROमध्ये ऑल इंडिया रँक मध्ये पहिला व व्हेहिकल मेकॅनिकल मध्ये देशातून ३७ वा. 

दोन यश संपादन केल्यामुळे अभिनंदनचा वर्षाव.

अमरदीप लोखंडे, सहसंपादक 
ब्रह्मपुरी : – २१/०९/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) ब्रह्मपुरी तालुक्यातील चकबोथली येथील वैभव ओमराज मेश्राम (वय २६) यांनी Border Roads Organisation (BRO), Ministry of Defence अंतर्गत झालेल्या निवड प्रक्रियेत देशपातळीवर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. DES (MSW) पदासाठी त्यांनी ऑल इंडिया रँक-1 (AIR-1) मिळविला असून, Vehicle Mechanic पदासाठी AIR-37 क्रमांक प्राप्त केला आहे. दोन्ही पदांसाठी निवड झाल्याने वैभव यांच्या या कामगिरीची विशेष नोंद झाली आहे.
वैभव मेश्राम यांनी पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले असून तांत्रिक क्षेत्रात कौशल्य संपादन केले आहे. ग्रामीण भागातील कष्टकरी कुटुंबातून आलेल्या वैभव यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आहे. त्यांचे आई-वडील श्रीमती बेबीनंदा मेश्राम व श्री. ओमराज मेश्राम हे मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आर्थिक अडचणी असतानाही वैभव यांनी शिक्षण आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर आपली वाटचाल सुरू ठेवली.
BRO अंतर्गत DES (MSW) पदासाठी AIR-1 मिळविण्यासोबतच Vehicle Mechanic पदासाठी AIR-37 क्रमांक प्राप्त करून त्यांनी दोन वेगवेगळ्या पदांसाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यशाचे श्रेय आई – वडील आणि मोठ्या भावाला 
आपल्या या यशाचे श्रेय वैभव मेश्राम यांनी आई श्रीमती बेबीनंदा मेश्राम, वडील श्री. ओमराज मेश्राम तसेच त्यांचे मोठे बंधू विहार मेश्राम, विद्यार्थी मित्र व सामाजिक कार्यकर्ता, ब्रह्मपुरी यांना दिले आहे. आई-वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीत केलेले कष्ट, दिलेले पाठबळ तसेच मोठ्या भावाने दिलेले मार्गदर्शन आणि प्रोत्साहन या यशाच्या प्रवासात महत्त्वाचे ठरल्याचे वैभव यांनी सांगितले.
चकबोथलीसह ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव
वैभव यांच्या देशपातळीवरील या कामगिरीमुळे चकबोथली, ब्रह्मपुरी तालुका आणि चंद्रपूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. त्यांच्या यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाने प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत देशपातळीवरील निवड प्रक्रियेत मिळविलेली ही कामगिरी परिसरातील विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्याला प्राधान्य देत वैभव यांनी मिळविलेल्या या यशाची परिसरात विशेष चर्चा होत आहे.
BROमधून पुढील वाटचालीला नवी दिशा.
BROमध्ये निवड झाल्यामुळे वैभव मेश्राम यांच्या पुढील कारकिर्दीला नवी दिशा मिळाली आहे. DES (MSW) मध्ये AIR-1 आणि Vehicle Mechanic मध्ये AIR-37 अशी कामगिरी करत त्यांनी चकबोथलीपासून देशपातळीपर्यंतचा उल्लेखनीय प्रवास गाठला आहे.
वैभव यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्र, चंद्रपूर जिल्हा, ब्रह्मपुरी तालुका आणि चकबोथली परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून,त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
error: Content is protected !!