Friday, August 14, 2026
Home Chandrapur सावलीत ट्रॅक्टर चालकांचा नियमांना फाटा ; विनापरवाना चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रशासनाचे...

सावलीत ट्रॅक्टर चालकांचा नियमांना फाटा ; विनापरवाना चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रशासनाचे दुर्लक्ष.

0
15

सावलीत ट्रॅक्टर चालकांचा नियमांना फाटा ; विनापरवाना चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन प्रशासनाचे दुर्लक्ष.

सुकदर्शन वृतांत 

सावली : सावली तालुक्यात वाहतूक नियमांची अंमलबजावणी केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनांपुरतीच मर्यादित राहिली असून,रस्त्यावर धावणाऱ्या शेकडो ट्रॅक्टर चालकांकडे वैध परवाना नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
विनापरवाना ट्रॅक्टर सावली मुख्यालय आणि तालुक्यात सुमारे २५० ट्रॅक्टर कार्यरत आहेत, परंतु यावर चालवणारे अनेक चालक हे प्रशिक्षित नसून केवळ मजूर किंवा कर्मचारी आहेत,ज्यांच्याकडे वैध परवाना नाही.कृषी विभागाच्या योजनांतून मिळालेल्या ट्रॅक्टरचा वापर शेतीऐवजी रेती,मुरुम आणि गिट्टी यांसारख्या गौण खनिजांच्या वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर केला जात आहे.
दुचाकी आणि चारचाकी चालकांवर कडक कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलीस आणि प्रशासन विभागाचे ट्रॅक्टर चालकांकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.अपघाताचा धोका ट्रॅक्टर चालक परवानाधारक नसल्यामुळे केवळ स्वतःचाच नव्हे, तर इतर वाहनचालक आणि नागरिकांच्या जीवितालाही मोठा धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर विषयाकडे वाहतूक विभाग,पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन संयुक्त मोहीम राबवावी आणि ट्रॅक्टर चालकांच्या परवान्याची व कागदपत्रांची तपासणी करावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.सध्या परिस्थिती अशी आहे की,अपघात झाल्यावर प्रशासन केवळ तात्पुरती कारवाई करते, परंतु नियमित तपासणीकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!