Friday, August 14, 2026
Home Education संत गाडगे बाबा,अमरावती विद्यापीठात डॉ.खानोरकरांचा पाठ अभ्यासक्रमासाठी. 

संत गाडगे बाबा,अमरावती विद्यापीठात डॉ.खानोरकरांचा पाठ अभ्यासक्रमासाठी. 

0
18

संत गाडगे बाबा,अमरावती विद्यापीठात डॉ.खानोरकरांचा पाठ अभ्यासक्रमासाठी. 

सुकदर्शन वृतांत 
ब्रह्मपुरी – १९/०६/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) चंद्रपुर जिल्ह्यातील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालय,ब्रह्मपुरी येथील मराठी विभागप्रमुख तथा कवी, लेखक,स्तंभलेखक व पत्रकार,हास्य नाट्य कलावंत,गोडी गुलाबी ची वाणी असलेले, नाराजीला ही क्षणात वाक्य यमकाने हास्यात फुलविणारे, कुर्झा- ब्रह्मपुरी येथील गल्लो न गल्ली प्रसिद्ध असलेले डॉ.प्राध्यापक धनराज खानोरकर
यांच्या प्रसिद्ध ‘ ‘संजोरी ‘ ललित ग्रंथातील ‘ पहाटेची काकड आरती म्हणजे अध्यात्मिक विविध भारती ‘ हा लेख संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात बी.ए.२,सत्र – ४ करिता मायनर डीएसई मराठी साहित्य, अभ्यासपत्रिका वैदर्भीय निवडक गद्य ‘ मुक्ताक्षरे ‘ पुस्तकात घेण्यात आला.असून डॉ धनराज खानोरकरांना विद्यापीठाने कळविले आहे.ते ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्षही राहिले आहेत.
डॉ.खानोरकरांचे ०५ कवितासंग्रह,सहा संपादित ग्रंथ व ‘ संजोरी ‘ हा झाडी बोलीतील लोकोत्सव व लोककलेवरचा बहुचर्चित ललितग्रंथ प्रकाशित असून ‘ संजोरी ‘ ग्रंथ गोंडवाना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.याशिवाय त्यांनी ४० संशोधन पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित केले आहेत.
ते प्रसिद्ध वक्ते असून अनेक ठिकाणी त्यांनी उद्बोधनपर व्याख्यानेही दिली आहेत.’ काळोखातले काजवे ‘ हा व्यक्तिचित्रण लेखसंग्रही त्यांचा लवकरच येतो आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलता भैया,उपाध्यक्ष अँड प्रकाश भैया,सचिव अशोक भैया,प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर, समस्त प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!