Saturday, October 10, 2026
Home Breaking News गडचिरोली – चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ बस पलटी ; 31 प्रवासी जखमी...

गडचिरोली – चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ बस पलटी ; 31 प्रवासी जखमी 📍जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले.

गडचिरोली – चामोर्शी मार्गावरील शिवणी गावाजवळ बस पलटी ; 31 प्रवासी जखमी

📍जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्यात आले.

सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : (दिनांक,18/09/2026)  शुक्रवार गडचिरोलीहून चामोर्शीकडे जाणाऱ्या MH.06.8848 क्रमांकाच्या बसला शिवणी गावाजवळ अपघात झाला. बसचे अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यावर पलटी झाली. या दुर्घटनेत जवळपास 31 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती असून,त्यापैकी 29 प्रवाशांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत.
ही घटना 18 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे 3:00 वा. सुमारास गडचिरोली-चामोर्शी मार्गावर घडली. अपघाताच्या वेळी बसमध्ये एकूण 68 प्रवासी प्रवास करत होते. यामध्ये एका लहान चिमुकल्याचाही समावेश होता. अपघातानंतर सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे सांगण्यात येत असून, काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघाताच्या कारणाबाबत अधिक माहिती घेतली असता, बस सुरू असतानाच अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले,अशी माहिती चालकाने दिली.जखमी प्रवाशांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील जुन्या आणि भंगार बसेसचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही बसचे चाक निखळल्यामुळे दोन वेळा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
याचबरोबर चामोर्शी – गडचिरोली राष्ट्रीय मार्गाच्या दुरवस्थेचा मुद्दाही पुढे आला आहे.या मार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या खराब स्थितीमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची स्थिती आणि जुन्या बसगाड्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
error: Content is protected !!