Home Gadchiroli देसाईगंज (वडसा) येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न 📍स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी...
देसाईगंज (वडसा) येथे वंचित बहुजन आघाडीची बैठक संपन्न
📍स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी संघटन मजबूत करण्याचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांचे आवाहन
सुकदर्शन वृतांत
देसाईगंज(वडसा) : दि.१८ सप्टेंबर २०२६ शुक्रवार येथे आज वंचित बहुजन आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात संपन्न झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे, जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. भीमराव शेन्डे, रघुनाथजी दुधे, तालुका अध्यक्ष विनोद मेश्राम, शहर अध्यक्ष प्रा. अशोक मेश्राम, तालुका महासचिव प्रविण रामटेके, तसेच दिलीप बन्सोड, शिवदास मेश्राम, नरेश गोंडाणे, धनराज मेश्राम, खुशाल मेश्राम, नितेश रामटेके, शिवाजी मेश्राम यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांनी पक्ष संघटना वाढविण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक प्रयत्न करावेत तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आतापासूनच जोमाने कामाला लागावे, असे निर्देश दिले. बूथनिहाय संघटन मजबूत करणे, नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत आगामी काळातील संघटनात्मक कार्यक्रम, स्थानिक पातळीवरील पक्षविस्तार आणि निवडणुकीच्या अनुषंगाने करावयाच्या नियोजनाबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झाली.कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
error: Content is protected !!