Home Breaking News सावली तालुक्यातील निलसनी (पेडगाव) परिसरात गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या 60 वर्षीय गुराखी...
सावली तालुक्यातील निलसनी (पेडगाव) परिसरात गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या 60 वर्षीय गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार
सुकदर्शन वृतांत
सावली : गुरे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सावली वनपरिक्षेत्रातील निलसनी पेडगाव परिसरात दिनांक, 16 सप्टेंबर 2026 बुधवार ला दुपारी 12:30वा. वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.वाघाच्या हल्ल्यात वासुदेव लक्ष्मण वाकुडकर वय,60 वर्ष निलसनी (पेडगाव) यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वासुदेव वाकुडकर हे नेहमीप्रमाणे सकाळी आपली जनावरे घेऊन गावालगतच्या सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड जंगल उपक्षेत्राच्या उपरी नियतक्षेत्रात गेले होते. यादरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात वासुदेव वाकुडकर यांचा मृत्यू झाला.माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.मृतदेहाचा पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहेत.
जंगलालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांच्या संचारामुळे उद्भवणारा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाच्या पुढील उपाययोजनांकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
error: Content is protected !!