Friday, August 14, 2026
Home Crime राज्य प्राणी शेकरूची शिकार वनविभागाच्या पथकाने त्रिकुटाला ठोकल्या बेड्या..! वनपरिक्षेत्र देचली अंतर्गत...

राज्य प्राणी शेकरूची शिकार वनविभागाच्या पथकाने त्रिकुटाला ठोकल्या बेड्या..! वनपरिक्षेत्र देचली अंतर्गत येणाऱ्या जोगनगुडा जंगलातील घटना ; संशयितांच्या घरातून भाला,लोखंडी तार व मांस जप्त..!

0
29

राज्य प्राणी शेकरूची शिकार वनविभागाच्या पथकाने त्रिकुटाला ठोकल्या बेड्या..!

वनपरिक्षेत्र देचली अंतर्गत येणाऱ्या जोगनगुडा जंगलातील घटना ; संशयितांच्या घरातून भाला, लोखंडी तार व मांस जप्त..!

सुकदर्शन वृतांत 

अहेरी : महाराष्ट्राचा राज्यप्राणी असलेल्या ” शेकरू ” (खार) या अत्यंत दुर्मिळ प्राण्याची बेकायदेशीर शिकार करणाऱ्या एका स्थानिक त्रिकुटाला वनविभागाच्या पथकाने १४ जून रोजी जेरबंद केले. वनपरिक्षेत्र देचली अंतर्गत येणाऱ्या उपक्षेत्र किष्टापूर नियत क्षेत्रातील मुखनपल्ली येथील जोगनगुडा जंगलात वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी लावलेल्या ” ट्रॅप कॅमेऱ्याने ” या शिकाऱ्यांचा भंडाफोड केला. मासा तंजा मडावी, हुंगा पोरया मडावी आणि सीताराम जोगा मडावी (सर्व रा. जोगनगुडा, ता.अहेरी) अशी अटक करण्यात आली.

आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.या धडक कारवाईमुळे परिसरातील वन्यजिवांची शिकार करणाऱ्या तस्करांचे धाबे दणाणले आहेत.जंगलातील वन्यप्राण्यांची अचूक गणना करणे आणि त्यांच्या हालचालींवर चोवीस तास लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाकडून जंगलात ठिकठिकाणी आधुनिक ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत.मुखनपल्ली नियत क्षेत्रातील अशाच एका कॅमेऱ्यामध्ये काही संशयित व्यक्ती हातात हत्यारे घेऊन शिकारीच्या उद्देशाने फिरताना आणि शिकार करताना रंगेहात कैद झाले होते.

कॅमेऱ्यातील हे फोटो समोर येताच वनविभागाने तात्काळ तपासचक्र फिरवले आणि छायाचित्रातील व्यक्तींची ओळख पटवून जोगनगुडा येथील संशयितांच्या घरांवर एकाच वेळी छापे टाकले. वनविभागाच्या पथकाने संशयित आरोपींच्या घरांची कसून झडती घेतली असता, तेथे धक्कादायक बाबी समोर आल्या. त्यांच्या घरात शिकारीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी तार, धारदार भाला तसेच अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या शेकरू या प्राण्याचे भाजलेले मांस आणि इतर संशयास्पद साहित्य आढळून आले. वनविभागाने हे सर्व साहित्य आणि मांस जप्त करून तिन्ही आरोपींना घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.

या तिघांनी यापूर्वीही अशा प्रकारे वन्यजिवांची शिकार केली आहे का, यादृष्टीने आता वनविभागाकडून कसून तपास सुरू आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या तिन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (Wildlife Protection Act) अन्वये विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर यशस्वी कारवाई गडचिरोलीचे उपवनसंरक्षक एम. नव किशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अहेरीचे उपविभागीय वनअधिकारी विष्णुवर्धन रेड्डी, देचलीचे वनपरिक्षेत्राधिकारी आर.डब्लू. बोरकर,किष्टापूरचे क्षेत्र सहायक एन.पी.कुडमेथे, देचलीचे क्षेत्र सहायक आर.बी. पाटील व वनरक्षक के.बी.वर्मा यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!