Home Chandrapur जुन्या रुढीपरंपरेची आठवण म्हणून धुमधडाक्यात लावला नेत्र दीपक बाहुला बाहुलीचे लग्न ;...
जुन्या रुढीपरंपरेची आठवण म्हणून धुमधडाक्यात लावला नेत्र दीपक बाहुला बाहुलीचे लग्न ; ऊद्देश- धोंडा धोंडा पाणी दे.
सुकदर्शन वृतांत
ब्रह्मपुरी – १५/०६/२६ (अमरदीप लोखंडे सहसंपादक) ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील बाल वयातील मुला – मुलींनी जुन्या परंपरेची आठवण म्हणून संभाव्य पाण्याचा पडणारा दुष्काळ लक्षात घेऊन पाऊस पडावा यासाठी बाहुला बाहुलीच्या लग्नाच्या परंपरेला उजाळा देण्यासाठी बाहुला बाहुलीचे लग्न लावले.
या लग्न सोहळ्या प्रसंगी वराचे काल्पनिक नाव चि.शिव याची वरात गावभर वाजत गाजत काढण्यात आली व वधू ची सौ .का. शक्ती वर्धक यांचा विवाह श्री शरद तलमले यांच्या डिजिटल सभागृहामध्ये बहुसंख्य पाहुणे मंडळींच्या उपस्थितीत भरजरी वेशभूषेच्या रोषणाईत पार पडला.विवाह सोहळा आटोपल्यानंतर लगेच मिष्टान्न स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली.
धोंड्याचा महिना सुरु असल्यामुळे आणि जांभळाच्या झाडाला भरपूर जांभळे लागून झाडाखाली जांभळाचा सडा पडतो तेव्हा पाण्याचा दुष्काळ पडतो अशी समजूत असल्याने भरपूर पाऊस पडावा या साठी – गावात पहिल्यांदाच बाहुला – बाहुलीचा डोळ्याचे पारणे फेडणारा झालेला विवाह सोहळा पाहून गावकऱ्यांनीआश्चर्य व्यक्त केले.तर वार्डातील मुला-मुलींच्या चेहऱ्यावर आनंद नाचत होते .
या विवाह सोहळ्याचे आयोजन श्रुती वकेकार, वैष्णवी वकेकार,समीक्षा नाकतोडे,रीना ठेंगरे,शितल ठेंगरे,भूमेश्वरी कुथे, आस्था नाकतोडे,हसीना ठेंगरे व इतर मुली यांनी अथक परिश्रम केले.यांच्या अथक परिश्रमाला साथ दिली आदेश नाकतोडे, इंद्रजित ठेंगरे, विठ्ठल पारधी,लक्की काळे या होतकरु बाल कलाकार मुलांनी.वर आणि वधू यांच्या आई, वडील,मामा,मामी यांचे पालकत्व व
स्नेह भोजनाची जबाबदारी महादेवजी पारधी,रविंद्र ठेंगरे ,रवींद्र नाकतोडे ,शंकर कुथे, रतन पारधी, सोमेश्वर वकेकार, जितेंद्र ठेंगरे ,मोतीराम जनबंधू ,रवींद्र वकेकार, रोशन नाकतोडे वनमाला वकेकार ,सीमा नाकतोडे ,नीता ठेंगरे ,चेतना वकेकार ,जयश्री नाकतोडे ,करुणा ठेंगरे व इतर आबाल वृद्धांनी ,वडीलधारी मंडळींनी उत्तम प्रकारे पार पाडली.
या विवाह सोहळ्याला गावातील बऱ्याच नागरिकांनी उपस्थिती दर्शवून नवदांपत्यास शुभ आशीर्वाद दिला आणि लवकरात लवकर पाणी पडू दे आणि शेतीच्या रोवण्या – धोवण्याच्या व इतर हंगामाला सुरुवात होऊ दे अशी आशा वधूवरांना शुभ आशीर्वाद देताना व्यक्त केली.
error: Content is protected !!