Home Breaking News आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर...
आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करून नोकरीची नियुक्ती..!
📍आरोग्य विभागात नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून तिघांकडून 5 लाख 40 हजाराची केली फसवणुक..!
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत नोकरीचे आमिष दाखवून 5 लाख 40 हजारांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींवर गडचिरोली पोलिसांत गुन्हा दाखल केला.असून, राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत विविध पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्यांचा वापर करून खोटे नियुक्ती आदेश देणाऱ्या दोन भामट्यांविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक’ यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
माहे सप्टेंबर 2025 ते दिनांक 05/07/2026
आरोपी : –
१) देवानंद बापुजी उराडे वय,56 वर्ष रा. इंदिरानगर,गडचिरोली)
२) राकेश प्रमोद मुंगेलवार वय,29 वर्ष रा.न्यू बुद्धीस्ट कॉन्व्हेंट स्कूलजवळ, कॅम्प एरिया, गडचिरोली)
यांनी संगनमत करून सुजाता रमेश बारशिंगे(रा.महागाव बोरी जि.गोंदिया),श्वेता देवराव उसेंडी (रा.येरकड,ता.धानोरा) आणि प्रगती अंबादास वैरागडे (रा.नवेगाव, जि.गडचिरोली) यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानात अनुक्रमे सफाई कामगार, कक्ष सहाय्यक आणि जी.एन.एम.(GNM) या पदांवर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले देऊन चांच्याकडून 5 लाख 40 हजार रुपये लुबाडले.
आरोपींनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) व जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO), जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या स्कॅन केलेल्या बनावट स्वाक्षऱ्या व शिक्क्यांचा गैरवापर केला. त्यांनी वरील उमेदवारांकडून एकत्रित 5 लाख 40 हजार रुपये (रोख व ऑनलाईन स्वरूपात) उकळले आणि त्यांना कार्यालयाचे खोटे व बनावट नियुक्ती आदेश देऊन त्यांची आर्थिक व मानसिक फसवणूक केली.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांत रीतसर तक्रार दाखल करण्यात आली. अश्या भामट्या पासुन नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन गडचिरोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार चव्हाण यांनी केले.
error: Content is protected !!