Monday, September 14, 2026
Home Chandrapur महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वतःच्याच घरात गळफास घेऊन केली आत्महत्या.

महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वतःच्याच घरात गळफास घेऊन केली आत्महत्या.

महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वतःच्याच घरात गळफास घेऊन केली आत्महत्या.

सुकदर्शन वृतांत 
नागभीड : नागभीड तालुक्यातील नांदेड येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वतःच्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना शनिवारी (दि.4) दुपारी 12:00.वा.च्या सुमारास उघडकीस आली. लौकिक सुरेश कुंभरे वय,19 वर्ष असे मृतकाचे नाव आहे.
लौकिक कुंभरे हा ब्रह्मपुरी येथे BSC प्रथम वर्षात शिकत होता.शनिवारी तो घरातील स्वतःच्या खोलीत असताना, त्याने सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावला.माहिती मिळताच तळोधी (बा.) पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
मृतदेह शवविच्छेदनासाठी नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविला.प्रेम प्रकरणातून आत्महत्या केल्याची नागरिकांत चर्चा आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल गुहे करीत आहे.
error: Content is protected !!