Home Chandrapur “अती उत्कृष्ट सेवा पदक” प़ाप्त उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांचा राज्य...
“अती उत्कृष्ट सेवा पदक” प़ाप्त उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांचा राज्य पत्रकार संघातर्फे सत्कार.
सुकदर्शन वृतांत
मूल : (राजेंद्र वाढई उपसंपादक) केंद्रीय “अती उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांचा राज्य मराठी पत्रकार संघातर्फे उपविभागीय पोलीस कायाॅलय मूल येथे संघाचे
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष (निवड समिती) यांचे उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा शाखेतर्फे शाल व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन शुभेच्छा देण्यात आली.
मूल, सावली, पोंभुर्णा व गोंडपिपरी तालुक्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सत्यजित आमले हे मूल उपविभागीय पोलीस कार्यालयात गत वर्षभरापासून कायॅरत आहेत. न्यायप्रिय, शिस्तप्रिय, मनमिळाऊ स्वभावाचे अधिकारी असलेले आमले यांना नुकताच पोलीस अधिक्षक यांचे हस्ते ” केंद्रीय अती उत्कृष्ट सेवा पदक” देऊन गौरवांकित करण्यात आले आहे.
मुंबई, नाशिक, गडचिरोली, सह अनेक जिल्ह्यात सत्यजित आमले यांनी पोलीस विभागात उत्कृष्ट सेवा दिली आहे.या सत्कार सोहळ्यात प़ा. महेश पानसे यांचे सह संघाचे जिल्हा अध्यक्ष शंकर बोरघरे, संघाचे डिजिटल मिडिया जिल्हा अध्यक्ष राहूल थोरात, जेष्ट पदाधिकारी प्रदिप रामटेके, यांचेसह मूल, राजुरा, भद्रावती, सिंदेवाही, नागभीड, तळोधी,चिमूर तालुकाध्यक्ष व पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी सत्यजित आमले यांनी पदाधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली.
error: Content is protected !!