Friday, August 14, 2026
Home Gadchiroli हरवलेले व चोरीला गेलेले 21 मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास...

हरवलेले व चोरीला गेलेले 21 मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश  पोलीस स्टेशन गडचिरोली पोलीसांच्या प्रयत्नांनी नागरिकांना मोबाईल फोन सुपूर्द

0
19

हरवलेले व चोरीला गेलेले 21 मोबाईल फोन शोधून काढण्यात गडचिरोली पोलीस दलास यश 

पोलीस स्टेशन गडचिरोली पोलीसांच्या प्रयत्नांनी नागरिकांना मोबाईल फोन सुपूर्द

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : (दि.05/08/2026 बुधवार) आजकाल तरुणपिढी मोठ्या प्रमाणात मोबाईलचा वापर करीत असून मोबाईल हाताळतांना तसेच प्रवासादरम्यान मोबाईल हरविल्यानंतर किंवा चोरीस गेल्यानंतर सदरची तक्रार संबंधित पोलीस स्टेशन येथे नोंदविली जाते.
याबाबत पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.एम.रमेश यांचेकडून सायबर अपराध व मोबाईल चोरीच्या गुन्ह्रांबाबत सतर्क राहून सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने पोलीस स्टेशन, गडचिरोली यांचे मार्फत तांत्रिक कौशल्याच्या आधारे सदर चोरीस गेलेल्या तसेच हरवलेल्या 21 मोबाईलचा शोध घेण्यात आलेला आहे.
मोबाईल हरवला किंवा चोरीस गेल्यास सदर मोबाईलद्वारे सायबर गुन्हे घडण्याची जास्त शक्यता असल्यामुळे हरवला किंवा चोरीस गेलेल्या मोबाईलचा लवकरात लवकर शोध घेणे आवश्यक असते. या बाबींचा विचार करुन पोलीस स्टेशन गडचिरोली येथे हरविलेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईलबाबत दाखल गुन्ह्रांच्या अनुषंगाने तपास करण्यात आला.
पोलीस स्टेशन गडचिरोली येथील सायबर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण व सातत्यपूर्ण तपासाच्या माध्यमातून हरवलेले एकूण 21 मोबाईल फोन शोधून काढण्यात यश मिळविले आहे. मोबाईल हरवल्यानंतर नागरिकांनी त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यामूळे व CEIR प्रणालीसह तांत्रिक साधनांचा प्रभावी वापर करून तपास करण्यात आला.
त्यातून विविध ठिकाणांहून हे मोबाईल हस्तगत करण्यात आले. शोधण्यात आलेल्या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत रु. 6,00,000/- इतकी असून सदरचे मोबाईल फोन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आज दिनांक,05 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे संबंधित मूळ मालकांना बोलावून परत करण्यात आले.
यावेळी संबंधित नागरिकांनी हरवलेले मोबाईल परत मिळाल्याबद्दल पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले.यासोबतच सन 2026 या वर्षात गडचिरोली पोलीस स्टेशनच्या सायबर टीमच्या वतीने एकूण 90 मोबाईल फोन आज पावेतो नागरिकांना परत करण्यात आलेले आहेत.
सध्या सायबर गुन्ह्राचे प्रमाण वाढत असून, सायबर गुन्हेगारंामार्फत लोकांची वेगवेगळ्या प्रकारची आमिष दाखवुन फसवणुक केली जाते. मोबाईल चोरी झाला असेल तर तात्काळ CEIR.GOV.IN (Central Equipment Identity Register) या पोर्टलवर आपण तक्रार नोंदवावी.
तसेच मोबाईल हरवल्यास किंवा चोरी झाल्यास न घाबरता पोलीसांवर विश्वास ठेऊन तात्काळ जवळच्या पोस्टे/उपपोस्टे/पोमकें तसेच सायबर पोलीस स्टेशन,गडचिरोली यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने करण्यात येत आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.एम.रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी.सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री.अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!