Home Gadchiroli जारावंडीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी.
जारावंडीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहात साजरी.
सुकदर्शन वृतांत
एटापल्ली : दि.१ ऑगस्ट : मौजा जारावंडी तह.एटापल्ली, जिल्हा गडचिरोली येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुगे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जारावंडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधाकरजी टेकाम होते.प्रमुख उपस्थितीत उपाध्यक्ष तथा पोलिस पाटील मा.जनकशहा नाहमुर्ते, सामाजिक कार्यकर्ते रमेश दुग्गा,ग्रामपंचायत सदस्य मुकेश कावळे,रमेश बोनगीरवार, मल्लाजी येनगंटीवार, रमजान पठाण, निळकंठ चौधरी,राजकुमार मोहुर्ले आणि दिलीप गुरनुले उपस्थित होते.
या प्रसंगी संदीप येनगंटीवार,भारत चन्नेवार,लक्ष्मण चन्नेवार,संपत चन्नेवार,लोकेश येनगंटीवार, प्रकाश चन्नेवार, आकाश चन्नेवार,कार्तिक चन्नेवार,चंद्रशेखर चन्नेवार यांच्यासह अनेक समाजबांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक एकता, शिक्षण आणि समाजप्रबोधनासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाचे आयोजन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज संघटना,जारावंडी यांच्या वतीने करण्यात आले.
error: Content is protected !!