Friday, August 14, 2026
Home Education पोटेगाव केंद्राची पहिली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.

पोटेगाव केंद्राची पहिली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.

0
16

पोटेगाव केंद्राची पहिली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न.

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : दिनांक,28 जुलै 2026 पोटेगाव केंद्राच्या वतीने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, पोटेगाव येथे नवीन शैक्षणिक सत्रातील पहिली शिक्षण परिषद उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.कार्यक्रमाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती, पोटेगावचे अध्यक्ष मा.ओंकारेश्वर शेडमाके यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख मा.विनोद रायपूरे सर होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्र शाळेचे मुख्याध्यापक चक्रपाणी कन्नाके तसेच गटसाधन केंद्र, गडचिरोलीचे विषयतज्ज्ञ सुनील लोहकरे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध परिपाठाने उपस्थितांची मने जिंकली.
शिक्षण परिषदेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अनुषंगाने राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. उजळणी पाठ, अध्ययन-अनुभव कार्यशाळा, विद्या प्रवेश, सेतू अभ्यासक्रम, विद्यांजली पोर्टल, यू-डायस प्लस, पीजीआय, इको क्लब, जयंत नारळीकर उपक्रम, खान अकॅडमी, परख शैक्षणिक उपक्रम तसेच ‘माझा वर्ग, माझी शाळा’ यांसारख्या प्रभावी उपक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षांना विशेष महत्त्व देत केंद्रप्रमुख विनोद रायपूरे यांनी सखोल मार्गदर्शन केले.यावेळी राजू उंदीरवाडे, जगदीश मडावी, शिला सिडाम, सुनील लोहकरे, सरदू चिराम आणि निलेश नैताम यांनी विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी केंद्र शाळेतील संगीता कोल्हे मॅडम व लोखंडे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले. परिषदेला पोटेगाव केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि.प.प्राथमिक शाळा, कन्हाळगाव चे मुख्याध्यापक गंगाधर मडावी यांनी केले, तर उपस्थितांचे आभारही त्यांनीच मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!