Home Gadchiroli चिखलात फसलेला ट्रॅक्टर बाहेर काढण्याच्या प्रयत्नात युवकाचा मृत्यू ; ट्रॅक्टर अचानक पलटी...
चिखलात फसलेला ट्रॅक्टर बाहेर काढण्याच्या प्रयत्नात युवकाचा मृत्यू ; ट्रॅक्टर अचानक पलटी झाल्याने घडली घटना..!
सुकदर्शन वृतांत
कुरखेडा (दि.10) : शेतात चिखलात अडकलेला ट्रॅक्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न एका 30 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतल्याची दुर्दैवी घटना कुरखेडा तालुक्यातील मौशी येथे शुक्रवारी सायंकाळी घडली.ट्रॅक्टर अचानक पलटी होऊन चालक त्याखाली दबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेमुळे मौशी गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणाचे नाव विवेक जीवन कोडाप वय,30 वर्ष रा.मौशी असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,विवेक कोडाप हे शुक्रवारी सायंकाळी सुमारे 4 वाजता आपल्या शेतात MH.35 AG 7156 क्रमांकाच्या ट्रॅक्टरने नांगरणीचे काम करत होते. यावेळी ट्रॅक्टर चिखलात फसला. तो बाहेर काढण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टरच्या चाकाखाली लाकडी बल्ली टाकून ट्रॅक्टर पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
अचानक ट्रॅक्टरचा तोल जाऊन तो मागील बाजूने पलटी झाला आणि विवेक यांच्या अंगावर कोसळला.या भीषण अपघातात ट्रॅक्टरखाली दबल्याने विवेक कोडाप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच कुरखेडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे पाठविण्यात आला.
या प्रकरणी कुरखेडा पोलीस पुढील तपास करीत आहेत. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून,कोडाप कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
error: Content is protected !!