Home Gadchiroli वन विभागाचा कौतुकास्पद पुढाकार! अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेला ” नायगुंडा नाला ”...
वन विभागाचा कौतुकास्पद पुढाकार! अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेला ” नायगुंडा नाला ” स्वखर्चाने आणि श्रमदानाने केला दुरुस्त.
📍झिंगानूर परिसरातील अनेक गावांतील ग्रामस्थांना आणि वनकर्मचाऱ्यांना मिळाला मोठा दिलासा ; प्रशासनाच्या उदासीनतेनंतर वन विभाग सरसावला
सुकदर्शन वृतांत
सिरोंचा : झिंगानूर ते सिरकोंडा मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा असलेला नैगुंडा नाला’ गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत दुरवस्थेत होता.या नाल्यावरील पुलाची झालेली दुरवस्था आणि बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांमुळे येथून प्रवास करणे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले होते सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर झिंगानूर वन परिक्षेत्रातील वन अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला.
शासकीय निधीची वाट न पाहता, वन विभागाने स्वखर्चाने आणि श्रमदानातून या नाल्याची दुरुस्ती करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
ग्रामस्थांची आणि वनकर्मचाऱ्यांची मोठी कोंडी : –
झिंगानूर, मंगीगुडम,येडसिली आणि वडदेली या गावांतील हजारो ग्रामस्थांना तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या ‘सिरोंचा’ येथे जाण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. नाल्याच्या खराब अवस्थेमुळे रुग्णांना रुग्णालयात नेणे, शाळकरी मुलांचा प्रवास आणि दैनंदिन कामांसाठी सिरोंचा येथे जाणे कमालीचे कठीण झाले होते.
तसेच, हा भाग घनदाट जंगलाचा असल्याने झिंगानूर वन परिक्षेत्रातील वनकर्मचाऱ्यांना जंगलाचे रक्षण करण्यासाठी, तस्करांवर नजर ठेवण्यासाठी आणि वन्यजीवांच्या संरक्षणासाठी याच मार्गावरून नियमित गस्त घालावी लागते. या नादुरुस्त नाल्यामुळे वन विभागाच्या वाहनांना आणि गस्ती पथकाला मोठा अडथळा निर्माण होत होता.
अशी झाली ‘श्रमदाना’तून नाल्याची दुरुस्ती (वनपाल व वनरक्षकांचा सक्रिय सहभाग) –
वारंवार मागणी करूनही दुरुस्ती होत नसल्याचे पाहून, झिंगानूर वन परिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत नरेंद्र खैरनार यांनी आणि समाजसेवक. रामचंद्र कुमरी, व वनक्षेत्र सय्यक (वनपाल) भारत निमगडे. या नैगुंडा नाल्याच्या विषय चर्चा करण्यात आली.
40, वर्षे पेक्षा जस्त वर्षे झाली पूर्णपणे खड्डे पडले त्यामुळे चर्चा करून सिमेंट काँकरेट टाकण्याची निर्णय घेऊन लाघेच श्रमदानातुन करण्याची वनविभागाचे वनधिकारी मर्फत व सहकाऱ्यांनी काम करण्यात आली.आपल्या सहकाऱ्यांसह नाल्याची डागडुजी करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आवश्यक असलेले सिमेंट व इतर साहित्य वन कर्मचाऱ्यांनी स्वखर्चातून उपलब्ध केले.
त्यानंतर प्रत्यक्ष घटनास्थळी वनपाल भारत निमगडे आणि वनपाल भारत रामपुरकर यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण पथकाने श्रमदान केले. या मोहिमेत पुरुष वनरक्षक श्री. एस.एन.वाढई, श्री. जी. एच. टेकाम, श्री. नरोटे, श्री. आर.के. कोरामी, श्री. के.बी. कवडो, श्री.एस.एल.मडावी, श्री.यु.एस. उसेंडी, श्री.व्ही.एस. शेट्टिवार आणि श्री. डी.के.मडावी यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून कष्टाचे काम केले.
पुरुष कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून महिला वनरक्षक कु. पी.एल. आत्राम, कु. बी.पी.धुर्वे, कु.आर.आर.कोरामी, कु.ए.के. खुर्से आणि कु.पी.व्ही.पोटावी यांनी देखील हिररीने भाग घेतला.
या संपूर्ण प्रक्रियेत वन विभागाच्या वन संरक्षण मजुरांनी देखील मोलाचे श्रमदान करून वन विभागाला मोठी मदत केली. वन कर्मचाऱ्यांनी स्वतः कंबर कसून आणि परिश्रम घेऊन बाहेर आलेल्या घातक सळ्यांवर सिमेंट-काँक्रीटचे मिश्रण टाकले व हा रस्ता पूर्णपणे सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सुयोग्य केला.
तर वन विभागाने करून दाखवले..!
नैगुंडा नाल्याची अवस्था पाहून अपघात होण्याची दाट शक्यता होती. ग्रामस्थांची गैरसोय आणि वनपरिक्षेत्रात गस्त घालताना होणारा त्रास लक्षात घेऊन आम्ही सर्वांनी मिळून स्वखर्चाने आणि श्रमदानातून हा मार्ग दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. सर्व वनपाल, वनरक्षक आणि वन संरक्षण मजूर यांनी यात दिलेले योगदान मोलाचे आहे.” – प्रशांत नरेंद्र खैरनार (वनपरिक्षेत्र अधिकारी, झिंगानूर वन विभाग)
नागरिकांना मोठा दिलासा: ग्रामस्थांनी मानले आभार…
“अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून जाताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. आज वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्वतः मेहनत घेऊन आणि सर्व काम करून हा रस्ता अतिशय उत्तम रितीने सुस्थितीत केला आहे. वन कर्मचाऱ्यांनी आमच्यासाठी केलेल्या या कष्टाबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत.”
समाजसेवक माजी ग्रामपंचायत सदस्य. रामचंद्र कुमरी,माजी सरपंच कोर्ला. मनोहर चेडे तिरुपती दुर्गम,शंकर मडावी,समय्या दुर्गम, मितुन कोंडागोर्ला, राकेश मडावी, (स्थानिक ग्रामस्थ)
वन विभागाच्या कामगिरीचे संपूर्ण तालुक्यात कौतुक : –
प्रशासकीय दिरंगाईला कंटाळलेल्या स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या या कामगिरीचे जोरदार स्वागत केले आहे. झिंगानूर, मंगीगुडम, येडसिली आणि वडदेली येथील ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले.
” जे काम मोठ्या यंत्रणेला जमले नाही, ते वन विभागाच्या संपूर्ण टीमने, महिला-पुरुष कर्मचाऱ्यांनी आपल्या घामातून आणि कष्टाने करून दाखवले,” अशा भावना व्यक्त केल्या आहेत. या कौतुकास्पद कामाची सध्या संपूर्ण तालुक्यात चर्चा सुरू आहे.
error: Content is protected !!