Monday, September 14, 2026
Home Gadchiroli रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी वामनरावजी मिसार यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांना निवेदन.

रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी वामनरावजी मिसार यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांना निवेदन.

रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी वामनरावजी मिसार यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांना निवेदन.

सुकदर्शन वृतांत 
ब्रह्मपुरी- १०/०७/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) अ-हेरनवरगाव ते ब्रह्मपुरी खड्डेमय रस्त्याची दुर्दशा पाहून अ-हेरनवरगांव येथील काँग्रेस पदाधिकारी तथा ब्रह्मपुरी तालुका शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष वामनरावजी मिसार यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य अभियंता, ब्रह्मपुरी यांना रस्त्यातील खड्डे बुजविण्याचे निवेदन दिले. 
वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची , वामनरावजी मिसार यांनी दिलेल्या निवेदनाची तसेच अ-हेरनवरगांव येथील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्याकडे रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा मुद्दा रेटून धरल्यामुळे तात्पुरते गड्डे बुजविण्यात आले.
सदर गड्डे बुजविल्यामुळे अ-हेरनवरगांव, भालेश्वर, पिंपळगाव भोसले, नांदगाव व परिसरातील जनतेने समाधान व्यक्त केलेआहे.परंतु पावसाळा संपताच लवकरात लवकर सदर रस्त्याचे बांधकाम करण्यास चिमूर क्षेत्राच्या लोकप्रतिनिधींनी तळमळीने लक्ष द्यावे अशी या परिसरातील जनतेची मागणी आहे.
आतापर्यंत हाल – अपेष्टा खूप भोगून झाल्या त्यामुळे सुखा – समाधानाने प्रवास करता यावा यासाठी आंदोलनासारखे शस्त्र हाती घ्यावा लागेल असेही जनतेने आपल्या भावना बोलून दाखविल्या.
error: Content is protected !!