Saturday, August 1, 2026
Home Gadchiroli नवेगाव – मुरखळा बालोद्यानासाठी शासकीय जागा राखीव ठेवण्याची मागणी.

नवेगाव – मुरखळा बालोद्यानासाठी शासकीय जागा राखीव ठेवण्याची मागणी.

0
20

नवेगाव – मुरखळा बालोद्यानासाठी शासकीय जागा राखीव ठेवण्याची मागणी.

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : नवेगाव – मुरखळा तालुक्यातील नवेगाव – मुरखळा येथील सर्व्हे क्र.75(1)/1 मधील शासकीय जागा बालोद्यान तसेच नागरिकांच्या सार्वजनिक उपयोगासाठी कायमस्वरूपी राखीव ठेवण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, संबंधित जागेवर बालोद्यान विकसित झाल्यास परिसरातील बालकांना सुरक्षित व सुसज्ज खेळण्याची सुविधा उपलब्ध होईल. तसेच सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक उपक्रमांसाठीही या जागेचा उपयोग होऊ शकतो. गावाच्या भविष्यातील विकासाचा विचार करता ही शासकीय जागा सार्वजनिक हितासाठी राखीव ठेवणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी अरुण केळझरकर,राणी गोपशेटवार, जयेंद्र राऊत व पवन गोपशेटवार,राजेंद्रजी शंखदरवार, चरणदासजी बोदेले,विस्तारी फेबुलवार यांनी आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या मागणीची दखल घेऊन संबंधित विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करावी,अशी विनंती करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!