Friday, July 31, 2026
Home Breaking News विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर च्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती.

विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर च्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती.

0
23

विश्वास नांगरे पाटील यांची नागपूर च्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती.

सुकदर्शन वृतांत 
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांचा गृहजिल्हा असलेल्या शहरात पोलीस प्रशासनात महत्त्वाचा बदल करत राज्य गृहमंत्रालयाने मंगळवारी वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अडीच वर्षांहून अधिक काळ नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले रविंद्र कुमार सिंगल यांची बदली करण्यात आली असून त्यांची नियुक्ती नांगरे पाटील यांच्या जागी लाच लुचपत विभागाच्या अपर पोलीस महासंचालक पदावर करण्यात आली आहे.
कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही सिंगल नागपुरात कार्यरत होते. अखेर गृहमंत्रालयाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय घेत त्यांच्या जागी नांगरे पाटील यांच्यावर नागपूर शहराची धुरा सोपवली.
राज्यातील अप्पर पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसह राज्य पोलीस सेवेतील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचेही रखडलेले बदली आदेश मंगळवारी जारी करण्यात आले.
अमरावती येथील पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांची नागपूर येथे बदली करण्यात आली असून त्यामुळे शहर पोलीस दलाला आणखी एक उपायुक्त मिळाले.
नागपूर विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार गृहविभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी या बदल्यांचे आदेश जारी केले.
विश्वास नांगरे पाटील यांच्या नियुक्तीमुळे नागपूर पोलीस दलाच्या नेतृत्वात नवे पर्व सुरू होणार असून कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनाच्या दृष्टीने त्यांच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!