Friday, August 14, 2026
Home Maharashtra अनुसूचित जाती संवर्गात ५९ जाती आहे. ” अ,ब,क,ड ” अशी गटवारी करणे...

अनुसूचित जाती संवर्गात ५९ जाती आहे. ” अ,ब,क,ड ” अशी गटवारी करणे सामाजिक एकतेला सुरुंग लावण्याचे सरकारचे धोरण. 📍अनुसूचित जाती उपवर्गीकरणा विरोधात नागपुरात एकवटल्या विविध संघटना,सरकारला इशारा.

0
16

अनुसूचित जाती संवर्गात ५९ जाती आहे. ” अ,ब,क,ड ” अशी गटवारी करणे सामाजिक एकतेला सुरुंग लावण्याचे सरकारचे धोरण.

📍अनुसूचित जाती उपवर्गीकरणा विरोधात नागपुरात एकवटल्या विविध संघटना,सरकारला इशारा.

सुकदर्शन वृतांत 
नागपूर : अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समितीतर्फे शनिवार, २० जून रोजी अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणा विरोधात नागपुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले. विविध संघटनांनी एकत्र येऊन काढलेल्या या मोर्चात घोषणाबाजी करीत सरकारला इशारा दिला.
दीक्षाभूमीहून दुपारी ४ वाजता मोर्चाला सुरुवात झाली.अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केल्यानंतर दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मोर्चा सुरू झाला. अनुसूचित जाती संवर्गात ५९ जाती आहे .
” अ, ब, क, ड ” अशी गटवारी करणे हे केवळ घटनात्मक प्रश्न नसून सामाजिक एकतेला सुरुंग लावण्याचे सरकारचे धोरण आहे. तसे षडयंत्र रचले गेले आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.बदर समितीचा अहवाल सार्वजनिक होण्यापूर्वीच त्यावर आक्षेप मागविले गेले. राज्याच्या इतिहासात अशाप्रकारे सार्वजनिक व मंजूरी न मिळालेल्या अहवालावर आक्षेप मागविण्याचा प्रकार सरकारने केला.
पावसाळी अधिवेशनात हा अहवाल मांडून तो मंजूर करण्याची घाईही सरकारला झाल्याचे दिसून येते. यावरून सरकारची मानसिकता स्पष्ट होत असून, अनुसूचीत जातींमध्ये भांडणे लावण्याची नामी संधी त्यांनी शोधून काढली.  ही कुटील निती यशस्वी होणार नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.
संविधानाचा विजय असो, उपवर्गीकर होऊ देणार नाही, आरक्षण आमच्या हक्काचे, आरक्षण विरोधी सरकार मुर्दाबाद, अशा घोषणा ही देण्यात आल्या.या मोर्चात अनुसूचित जातीचे नेतृत्त्व करीत असलेल्या अनेक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व सामान्य नागरिकही महापुरुषांचे फलक घेऊन सामिल झाले.
या मोर्चाला विराट स्वरुप आले. परिणामी काही भागात वाहतूकही विस्कळीत झाली होती. समितीचे अमन कांबळे,ॲड.आकाश मून, तक्षशीला वागधरे, ॲड. स्मिता कांबळे,प्रीतम बुलकुंडे,उषा बौद्ध यांच्या सह मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!