वादळी पावसामुळे उभे धान जमीन दोस्त व झाडे कोसळली
सुकदर्शन वृतांत
ब्रम्हपुरी – १९/०९/२६ (अमरदीप लोखंडे, सहसंपादक) रात्रो आलेल्या विजांच्या कडकडाटासह वादळी आलेल्या पावसामुळे शेतातील निसवणीस आलेले धानाचे उभे पिक जमीन दोस्त झाले तसेच शेताच्या बांधावर असलेले झाडे शेतामध्ये कोसळल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.रस्त्यावर सुद्धा झाडे कोसळल्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता.
धानावर असलेल्या खोडकीळा, तुळतुळा, करपा रोगावर औषधी मारू मारू कंगाल झालेल्या शेतकऱ्यांना निसर्गाने रात्रो झालेल्या वादळी पावसामुळे मोठाआघात सहन करावा लागला आहे. हल्ली शेतकऱ्यांची कंबर मोडून तोंडचा घास निसर्गाने हिरावून नेला.त्यामुळे उपासमारीची पाळी शेतकऱ्यावर आली आहे.
error: Content is protected !!