Home Gadchiroli शिवनी बस अपघातातील जखमींची वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे यांनी घेतली...
शिवनी बस अपघातातील जखमींची वंचित चे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे यांनी घेतली भेट
📍जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांची विचारपूस ; उपचाराबाबत घेतली माहिती
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : दि. १८ सप्टेंबर २०२६ : शिवनी गावाजवळ एसटी बसचा अपघात होऊन अनेक प्रवासी जखमी झाले. अपघातातील जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. प्रशांत देव्हारे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन अपघातातील जखमी रुग्णांची भेट घेतली.
यावेळी त्यांनी प्रत्येक रुग्णाची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. तसेच रुग्णालयात मिळत असलेल्या उपचारांबाबत डॉक्टर व संबंधित कर्मचाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.अपघातामुळे जखमी झालेल्या प्रवाशांना आवश्यक उपचार व वैद्यकीय सुविधा वेळेत मिळाव्यात,यासाठी रुग्णालय प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी,अशी अपेक्षा प्रा.प्रशांत देव्हारे यांनी व्यक्त केली.
जखमी रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना आवश्यक त्या मदतीसाठी वंचित बहुजन आघाडी त्यांच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!