Home Education अस्थिव्यंग व मुकबधिर निवासी शाळा पेरमिली येथे लोकशाही पत्रकार संघटने कडून विद्यार्थ्यांना...
अस्थिव्यंग व मुकबधिर निवासी शाळा पेरमिली येथे लोकशाही पत्रकार संघटने कडून विद्यार्थ्यांना स्कूल बॅग,नोट बुक,पेन शैक्षणीक साहित्य वाटप
सुकदर्शन वृतांत
अहेरी : लोकशाही पत्रकार संघटना पेरमिली च्या वतीने अस्थिव्यंग व मुकबधिर निवासी शाळा पेरमिली येथे शाळेतील विद्यार्थ्यांना शौक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले विद्यार्थ्यांच्या शौक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, नोट बुक, पेन व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष लोकशाही पत्रकार संघटना वरिष्ठ पत्रकार डॉ.शंकर दुर्गे होते. प्रमुख पाहुणे आसिफ खान पठाण,श्रीकांत दुर्गे, श्रीनिवास बंडमवार, पेरमिली आरोग्य केंद्राचे कर्मचारी वैरागडे तसेच पत्रकार व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच शाळेचे मुख्याद्यापक डॉ कमलेश झाडे, अधीक्षक कलंदर शेख अधीक्षक कु निता झाडे व विशेष शिक्षक सुशील सेमस्कर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला शालेय शिक्षकेतर कर्मचारी प्रवीण बनकर,रमेश भोयर,प्रफुल पाटील, श्रीकांत पुप्पाला, कालिदास खोब्रागडे, स्वप्नील दहागावकर,प्रशांत पिंपळकर,कु शालू चौधरी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शौक्षणिक साहित्याचे वितरण होत असताना पालक वर्गाने ही कार्यक्रमाला उपस्थित दर्शवून विद्यार्थांचा उत्साह वाढविला. यावेळी शामराव कागदेलवार, बाजीराव शेडमेक,परेश इष्टाम,संदीप तलांडे,आणी बाबुराव इष्टाम यांच्या सह पालक वर्ग उपस्थित होता.
error: Content is protected !!