Sunday, September 13, 2026
Home Chandrapur जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेरनवरगांव येथे ग्रंथालयाचे उद्घाटन व नोटबुकचे वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेरनवरगांव येथे ग्रंथालयाचे उद्घाटन व नोटबुकचे वाटप

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेरनवरगांव येथे ग्रंथालयाचे उद्घाटन व नोटबुकचे वाटप

सुकदर्शन वृतांत 
ब्रम्हपुरी- १९/०८/२६ (अमरदीप लोखंडे, सहसंपादक) आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी म्हणून बाल वयापासुन मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी व उत्तम विद्यार्थी घडावेत यासाठी केंद्रप्रमुख गावतुरे, मुख्याध्यापक गोन्नाडे व शिक्षकवृंद यांच्या संकल्पनेतून विद्यालयामध्ये ग्रंथालयाचे उद्घाटन वामनभाऊ मिसार यांनी केले.
विद्यार्थ्यांना वाचता वाचता लिहिण्याची सवय व्हावी, लिहिता लिहिता अक्षर सुंदर, वळणदार व्हावेत हा दूरदृष्टीकोण ठेवून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांचे कडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेनवरगांव येथील विद्यार्थ्यांना नोटबुक भेट देण्यात आले. 
देण्यात आलेले नोटबुक वितरण करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते वामनभाऊ मिसार, विनोद बुल्ले बेलगाव कोलारी, सुधीर शिवरकर तोरगाव, केंद्रप्रमुख गावतुरे, मुख्याध्यापक गोन्नाडे, संजय जराते यांनी विद्यालयातील पटांगणात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक शिक्षिका यांनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाचे संचालन शिक्षक मून तर आभार पाथोडे यांनी उपस्थितांचे मानले.
error: Content is protected !!