Home Chandrapur ॲकेडमिक कॅलेंडर बदलून विद्यार्थ्यांना जे हवे ते जीवन शिक्षण द्या. – कुलगुरू...
ॲकेडमिक कॅलेंडर बदलून विद्यार्थ्यांना जे हवे ते जीवन शिक्षण द्या. – कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे
सुकदर्शन वृतांत
ब्रह्मपुरी – दिनांक,१९/०८/२६ (अमरदीप लोखंडे, सहसंपादक) महाविद्यालयात विद्यार्थी संख्या कमी झाली आहे, याची सर्वत्र चर्चा होते. आपल्या शिक्षणव्यवस्थेतील निर्णयप्रकियेत त्यांना विचारले जात नाही. व्यवथेविषयी राग आहे.तसे पाहिले तर विद्यार्थी अनुकरणातून जास्त शिकतात.विद्यार्थ्यांना सांस्कृतिक,खेळ, स्पर्धापरीक्षाविषयी माहिती द्या.त्यांच्यात चैतन्य येईल.आपले ॲकेडमिक कॅलेंडर बदलून विद्यार्थ्यांना जीवन शिक्षण द्या!” असे जाहिर आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारेंनी केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात ‘ विद्यार्थी उपाययोजना गुणवर्धन क्लस्टर बैठकीत बोलत होते.
विचारपीठावर प्र- कुलगुरू डॉ श्रीराम कावळे, नेवजाबाई भैया शिक्षण संस्थेचे सदस्य गौरव अशोक भैया,परीक्षा नियंत्रक डॉ नविन मुंगळे, विद्यार्थी विकास योजनेच्या डॉ प्रिया गेडाम,सहा. कुलसचिव दिनेश नरोटे, प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. कुलगुरुंच्या मार्गदर्शनानंतर प्रश्नोत्तराचा तास घेण्यात आला.उपस्थित विद्यार्थ्यांसीही कुलगुरुंनी संवाद साधला.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर,संचालन डॉ. प्रकाश वट्टी तर आभार डॉ राजेंद्र डांगेनी मानले. यशस्वीतेसाठी डॉ.रेखा मेश्राम,डॉ.रतन मेश्राम,डॉ किशोर नाकतोडे,डॉ. धनराज खानोरकर,डॉ. युवराज मेश्राम,डॉ.आशिष साखरकर,रोशन डांगेनी सहकार्य केले.कार्यक्रमाला विविध महाविद्यालयाचे प्राचार्य,संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते
error: Content is protected !!