Home Chandrapur महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी वेणुदास पा.चुधरी यांची एकमताने निवड.
महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी वेणुदास पा.चुधरी यांची एकमताने निवड.
सुकदर्शन वृतांत
सावली : सायखेडा ग्रामपंचायतीच्या आज झालेल्या ग्रामसभेमध्ये गावातील कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी श्री.वेणुदास पा. चुधरी यांची एकमताने निवड करण्यात आली.
गावातील विविध तंटे व वाद सामोपचाराने मिटवून गावात शांतता, बंधुभाव आणि एकोपा निर्माण करण्यासाठी तंटामुक्ती समितीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. या पार्श्वभूमीवर ग्रामसभेत सर्वानुमते श्री. वेणुदास पा.चुधरी यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत असून,सायखेडा गाव तंटामुक्त व शांततामय करण्यासाठी त्यांच्या कार्यास सर्वांनी सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष श्री.वेणुदास पा. चुधरी यांना पुढील वाटचालीस ग्रामस्थ हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिले.
error: Content is protected !!