Home Gadchiroli राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील 2026 पुरस्काराने श्री.शशांक भास्करराव कुलसंगे यांचा गौरव.
राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील 2026 पुरस्काराने श्री.शशांक भास्करराव कुलसंगे यांचा गौरव.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : चुरचुरा माल, तालुका व जिल्हा गडचिरोली येथील कर्तव्यदक्ष पोलीस पाटील श्री.शशांक भास्करराव कुलसंगे यांच्या उल्लेखनीय सामाजिक व प्रशासकीय कार्याची दखल घेत त्यांना ” राज्यस्तरीय आदर्श पोलीस पाटील पुरस्कार 2026 ” देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचारविरोधी सामाजिक न्याय फाउंडेशन, भारत सरकार यांच्या वतीने कांकरिया भवन धुळे येथील आयोजित विशेष पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे,सामाजिक सलोखा निर्माण करणे, नागरिकांमध्ये जनजागृती करणे तसेच प्रशासन आणि जनतेमध्ये प्रभावी समन्वय साधणे या कार्याची विशेष दखल घेऊन श्री.कुलसंगे यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
गावातील शांतता व सुव्यवस्था राखताना त्यांनी नागरिकांशी सातत्याने संवाद साधत सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक सहकार्य करणे आणि सामाजिक बांधिलकी जपत जबाबदारी पार पाडणे, या कार्यामुळे त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
या भव्य पुरस्कार सोहळ्यास फाउंडेशनचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अशोक पवार, प्रदेश अध्यक्ष श्री. प्रफुल्ल पाटील, राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी श्री. किरीट पटेल, सेवानिवृत्त डीवायएसपी श्री.वासुदेव देसले, शिवव्याख्याते श्री. सचिन देवरे तसेच फाउंडेशनचे पारोळा तालुका अध्यक्ष श्री. भास्कर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्री. शशांक भास्करराव कुलसंगे यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री. कुलसंगे यांनी हा सन्मान आपल्या सामाजिक व शासकीय सेवेला मिळालेली प्रेरणा असल्याचे सांगत, भविष्यातही नागरिकांच्या हितासाठी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जबाबदारीने कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
श्री.शशांक भास्करराव कुलसंगे यांना मिळालेल्या या राज्यस्तरीय सन्मानाबद्दल चुरचुरामालसह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे पोलीस पाटील पदाची सामाजिक जबाबदारी अधिक प्रभावीपणे अधोरेखित झाली असून, त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
error: Content is protected !!