Monday, September 14, 2026
Home Chandrapur भविष्य घडविण्यासाठी अमली पदार्थांपासून दूर रहा ; अंमली पदार्थ विरोधी मोहीम. –...

भविष्य घडविण्यासाठी अमली पदार्थांपासून दूर रहा ; अंमली पदार्थ विरोधी मोहीम. – प्रमोद बानबले,पोलिस निरीक्षक

भविष्य घडविण्यासाठी अमली पदार्थांपासून दूर रहा ; अंमली पदार्थ विरोधी मोहीम. – प्रमोद बानबले,पोलिस निरीक्षक

सुकदर्शन वृतांत 
ब्रह्मपुरी : १८/०८/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) ” विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचे सेवन करु नये.हे पदार्थ तुमचे शरीर पोखरून मन कमकुवत करतात, त्यामुळे चिंता,निराशा, नकारात्मक भाव निर्माण होतो.आपले भविष्य घडविण्यासाठी अमली पदार्थांपासून तुम्ही दूर रहा!” असे आवाहन ब्रह्मपुरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद बानबलेंनी केले.
ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात ‘ अमली पदार्थ विरोधी मोहीम ‘कार्यक्रमात बोलत होते. याबाबत विद्यार्थ्यांना शपथही देण्यात आली. याप्रसंगी डॉ धनराज खानोरकरांनी आपले विचार मांडले.
कार्यक्रम प्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.कार्यक्रमाला डॉ.राजेंद्र डांगे,डॉ भास्कर लेनगुरे,डॉ प्रकाश वट्टी,डॉ.पद्माकर वानखडे व नगरसेविका,पोलिस ठाण्याचे कर्मचारी व बहूसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.संचालन व आभार डॉ प्रकाश वट्टींनी केले.
error: Content is protected !!