Friday, August 14, 2026
Home Breaking News गडचिरोली पोलीस दलातील 20 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा.राष्ट्रपती यांचे ”...

गडचिरोली पोलीस दलातील 20 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा.राष्ट्रपती यांचे ” पोलीस शौर्य पदक ” व 01 अधिकारी यांना ” गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक ” जाहिर 📍 27 अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट आणि 03 अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहिर

0
2

गडचिरोली पोलीस दलातील 20 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा.राष्ट्रपती यांचे ” पोलीस शौर्य पदक ” व 01 अधिकारी यांना ” गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक ” जाहिर

📍 27 अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट आणि 03 अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहिर

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : (दिनांक- 14/08/2026) देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शासनाकडून सन्मानित केले जात असते. यावर्षी सुद्धा आज दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला मा.महामहीम राष्ट्रपती यांचे संपूर्ण देशभरात एकूण 272 पोलीस शौर्य पदक व 606 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहिर झाले.
त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास 20 पोलीस शौर्य पदक व 01 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहिर झाले आहेत.गडचिरोली पोलीस दलास सन 2026 मध्ये एकूण 31 पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले असून मागील पाच वर्षात एकूण 03 शौर्य चक्र,237 पोलीस शौर्य पदक व 07 गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहेत.

पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार : – 

1) यतिश विजयराव देशमुख,पोलीस अधीक्षक,पालघर (तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक (अभियान), गडचिरोली)
2) सहाय्यक पोलीस निरीक्षक/ राजु पांडुरंग गवळी
3) सहाय्यक पोलीस निरीक्षक/वासुदेव राजम मडावी
4) पोहवा/5074 दिलीप विठ्ठल आत्राम
5) पोहवा/3032 मासा बोरा आत्राम
6) पोहवा/2643 विजय किष्टय्या कोडापे
7) नापोअं/5072 दशरथ रामशहा मडावी
8) पोअं/5724 अजय गोपालराव मडावी
9) पोअं/5782 गणेश चंद्रम डुब्बुला
10) पोअं/5960 विजय झुरु मडावी
11) पोअं/5901 भुपेश मारोतराव जुमनाके
12) पोअं/4636 राकेश राजम बेडकी
13) पोअं/5621 सुधाकर जगन पोरतेट
14) पोअं/5563 श्रीनिवास समय्या निष्ठुरी
15) पोअं/4629 गणेश हनमंतू गंजीवार
16) पोअं/5529 नितेश प्रभुदास टेंभेकर
17) पोअं/5587 शिवाजी मेस्सो हिचामी
18) 5884 संजय मल्लेश कंकाबंडावार
19) पोअं/126 राजेश शामराव किरंगे
20) पोअं/5167 दलसु कटिया बोगामी यांना पोलीस शौर्य पदक मिळाले असून, 1) यांना राष्ट्रपती यांचे गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक मिळाले आहेत.
सन 2023 मौजा केडमारा ता.भामरागड व सन 2024 मध्ये मौजा कंत्रनगट्टा ता.भामरागड येथे झालेल्या पोलीस माओवादी चकमकीमध्ये एकूण 06 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यास गडचिरोली पोलीस दलास यश प्राप्त झाले होते.
वरील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी सदरच्या चकमकीमध्ये केलेल्या यशस्वी कामगिरीची दखल घेऊन मा.राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक जाहिर झाले.
यासोबतच गृह मंत्रालय भारत सरकार यांच्याकडून पोलीस दलामध्ये 25 वर्षापेक्षा अधिक निष्कलंक सेवा बजावणा­या 27 अंमलदार यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक तसेच 15 वर्षापेक्षा अधिक निष्कलंक सेवा बजावणा­या 03 अधिकारी व अंमलदार यांना उत्कृष्ट सेवा पदक जाहिर करण्यात आले आहेत.
यावेळी सर्व पदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मा.पोलीस अधीक्षक श्री.एम.रमेश यांनी कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!