Friday, August 14, 2026
Home Gadchiroli महामार्गावर थरार..! धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळले. 📍चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखत...

महामार्गावर थरार..! धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळले. 📍चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.२८ जण बचावले.

0
5

महामार्गावर थरार..! धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळले.

📍चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.२८ जण बचावले.

सुकदर्शन वृतांत 
अहेरी : गडचिरोलीतील अहेरी आगारातून सिरोंच्याकडे जाणाऱ्या एसटी बसचे धावत्या अवस्थेत मागील चाक अचानक निखळले. अन् तब्बल १०० फूट दूर जाऊन पडल्याची धक्कादायक घटना मेळाराम गावाजवळ घडली.घटनेच्या वेळी बसमध्ये २८ प्रवासी प्रवास करत होते.
चाक निखळल्याचे लक्षात येताच चालकाने अत्यंत प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-४० ए.क्यू.- ६१२५ क्रमांकाची एसटी बस अहेरी आगारातून सिरोंच्याकडे जात होती.
मेळाराम गावाजवळ बस पोहोचताच अचानक तिच्या मागील बाजूचे चाक निखळले. धावत्या बसचे चाक वेगळे होऊन सुमारे १०० फूट अंतरावर शेतात जाऊन पडल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, चालकाने तत्परता दाखवत बस सुरक्षितपणे थांबवली आणि २८ प्रवाशांचे प्राण सुखरूप वाचवले.
विशेष म्हणजे, बस रस्त्यावर धावण्यापूर्वी तिची ‘प्रि-ट्रिप इन्स्पेक्शन’ (Pre-trip Inspection) तसेच नट-बोल्टची योग्य प्रकारे तपासणी करण्यात आली होती,अशी माहिती अहेरी आगाराचे डेपो मॅनेजर खाडिलकर यांनी दिली.
सध्या संबंधित बस सिरोंचा आगारात असून, अहेरी आगारात परतल्यानंतर तिची सविस्तर तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर चाक निखळण्याचे नेमके कारण स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.
पण आगारातून निघताना नियमित तपासणी झाल्याचा दावा केला जात असला, तरी भरधाव बसचे चाक अशा प्रकारे निखळल्याने एसटी महामंडळाच्या देखभाल व दुरुस्ती व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नट-बोल्ट व्यवस्थित कसले (तपासले) होते का? की ‘व्हील असेंब्ली’मध्ये (Wheel Assembly) काही तांत्रिक बिघाड होता ? या सर्व बाबींची निष्पक्ष व सखोल चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!