Thursday, August 13, 2026
Home Chandrapur एन.सी.सी.कमांडिंग ऑफिसर लेफ्ट.कर्नल प्रिती तिवारी यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला भेट व तिरंगा...

एन.सी.सी.कमांडिंग ऑफिसर लेफ्ट.कर्नल प्रिती तिवारी यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला भेट व तिरंगा रॅलीत सहभाग.

0
3

एन.सी.सी.कमांडिंग ऑफिसर लेफ्ट.कर्नल प्रिती तिवारी यांची डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला भेट व तिरंगा रॅलीत सहभाग.

सुकदर्शन वृतांत 
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) दि,१३/०८/२६ स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय येथील ०३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन.सी.सी.युनिटला एन.सी.सी. कमांडिंग ऑफिसर लेफ्ट.कर्नल प्रिती तिवारी यांनी भेट दिली.त्यांच्या प्रथम भेटी निमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेश कांबळे यांनी सन्मान चिन्ह व फूल झाड देऊन त्यांचा सन्मान केला.
या प्रसंगी कमांडिंग ऑफिसर लेफ्ट कर्नल प्रिती तिवारी मॅडम यांनी एन सी सी युनिटच्या गर्ल्स कॅडेटसना मार्गदर्शन केले.जिद्द चिकाटी कठोर मेहनत आणि आत्मविश्वास बाळगल्यास एन.सी.सी.कॅडेट देशसेवेसाठी कुठेही कमी पडणार नाही अनेक संधी उपलब्ध आहेत त्याचे सोनं करा असे सांगितले.आम्ही ग्रामीण भागातील आहोत हा न्यूनगंड न बाळगता हम भी कुछ कम नहीं हमारे भी होसले बुलंद है हा आत्मविश्वास ठेवून पुढे चला असा ही त्यांनी संदेश कॅडेट्स ना दिला. 
कार्यक्रमानंतर एन सी सी युनिटच्या वतीने हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली.यात कमांडिंग ऑफिसर लेफ्ट. कर्नल प्रिती तिवारी यांनी सहभाग घेतला. या रॅलीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेश कांबळे,कॅप्टन सरोज शिंगाडे पर्यवेक्षक मनोज चांभारे प्रामुख्याने उपस्थितीत होते.एन सी सी कॅडेट तथा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापक वृंदानी या रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला. 
या निमित्ताने एन सी सी युनिटच्या वतीने भारत टी बी मुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती पर विद्यार्थ्यांना मागदर्शन कार्यक्रम ठेवण्यात आला.यावेळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून मान.विलास लेनगुरे टी बी काऊन्सलर ग्रामीण रुग्णालय, ब्रम्हपुरी तसेच मान .प्राजक्ता फुलझेले एड्स काउन्सलर ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी यांनी विषयानुरूप सविस्तर मार्गदर्शन केले.  
सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ देवेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सी युनिट विभाग प्रमुख असोसिएट एन सी सी ऑफिसर कॅप्टन सरोज शिंगाडे यांनी संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केले.एन सी सी युनिट ०३महाराष्ट्र गर्ल्स बटालियन च्या ७५ कॅडेटस यांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!