Home Chandrapur साहित्यवारसा जपण्यासाठी कविसंमेलन, वैचारिक कार्यक्रमाची गरज. – अशोक भैया ” आविष्कार साहित्य...
साहित्यवारसा जपण्यासाठी कविसंमेलन, वैचारिक कार्यक्रमाची गरज. – अशोक भैया
” आविष्कार साहित्य मंच ” तर्फे आयोजित ” कविता पावसाच्या ” काव्यमैफल उत्साहात.
सुकदर्शन वृतांत
ब्रम्हपुरी – ११/०८/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) आविष्कार साहित्य मंच, ब्रम्हपुरी’ द्वारे आयोजित ‘कविता पावसाच्या’ या विशेष काव्यमैफलीचा सोहळा रविवारी अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. श्रावणाच्या सरींसोबतच शब्दांच्या पावसाचा सुंदर अनुभव या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिक श्रोत्यांना घेता आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक अशोकजी भैया यांनी आपल्या भाषणात आविष्कार साहित्य मंचाच्या कार्याचा गौरव करत आविष्कार साहित्य मंच, ब्रम्हपुरी हे या परिसरात साहित्यिक वारसा जिवंत ठेवण्याचे अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद कार्य करीत आहे. शहरात साहित्य वारसा जपण्यासाठी अशा कविसंमेलन व वैचारिक कार्यक्रमाची आवश्यकता आहे ,असे प्रतिपादन त्यांनी उद्घाटनीय भाषणात केले.
संमेलनाध्यक्ष नोमेश मेश्रामांनी अध्यक्षीय भाषणात कवितेच्या भावविश्वावर प्रकाश टाकला. “कविता हा मानवी भावनांचा सुंदर आविष्कार असतो आणि त्यातही पावसावर कविता लिहिणे व सादर करणे हा प्रत्येक कवीचा अतिशय आवडता विषय असतो,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर आणि कवी डॉ.धनराज खानोरकर यांनी यावेळी उपस्थित कवी व श्रोत्यांशी संवाद साधत आविष्कारच्या या यशस्वी आयोजनासाठी संपूर्ण आविष्कार टीमचे अभिनंदन केले.
या काव्यसंमेलनात निमंत्रित कवींनी एकाहून एक सरस आणि आशयघन कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. यात स्वप्नील उके, रोहित दोड, प्रशांत राऊत, राजेंद्र सोनटक्के, श्वेता निकुरे, गजानन माद्यस्वार, स्नेहा शेवाळकर, रश्मी देवगडे, डॉ. चंद्रकांत लेनगुरे, डॉ. रामेश्वर राठोड, रमेश बुरबुरे, विजय भगत, अर्जुमन शेख, तुळशीराम अंदिरवाडे, नेहा उमेश बन्सोड
नरेंद्र गंधारे, नागसेन सहारे, अंजू येवले, राहुल दहिवले, भारती लखमापुरे, रविंद्र चौधरी, विनोद गहाणे, सुरेश सुरजुसे, अनेका क्षीरसागर, सत्तू भांडेकर, सोनाली कोसे, विनायक लिंगायत, प्रभाकर दुर्गे इत्यादी निमंत्रित कवीं सहभागी झाले. पावसाच्या विविध रूपांचे, भावनांचे आणि निसर्गाचे विलोभनीय वर्णन कवींनी आपल्या रचनांमधून साकारले.
संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धरीत्या आणि नियोजित वेळेत पूर्ण झाला. या कार्यक्रमाचे नेटके आणि बहारदार सूत्रसंचालन वर्षा चौधरी यांनी केले. संमेलनात परिसरातील साहित्यप्रेमी व रसिकांची मोठी उपस्थिती लाभली होती.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आविष्कार साहित्य मंचाचे अध्यक्ष मंगेश जनबंधू, सचिव गौतम राऊत, ललित बोरकर तसेच मंजुषा साखरकर, भिमानंद मेश्राम, भाविक सुखदेवे, छाया जांभुळे, डॉ. धनराज खानोरकर, ज्योती नवघरे, शशी मदनकर, इंदु मुळे, सोनाली सहारे, चैतन्य मातुरकर, कल्पना सूर्यवंशी गेडाम, मंगेश गोवर्धन, अशोक शामकुळे आणि हिराकांत निहटे यांनी विशेष परिश्रम घेतले.
error: Content is protected !!