Thursday, August 13, 2026
Home Chandrapur व्यायामाने शरीर तर वाचनाने मन समृद्ध होते. – प्राचार्य डॉ शेकोकर.

व्यायामाने शरीर तर वाचनाने मन समृद्ध होते. – प्राचार्य डॉ शेकोकर.

0
2

व्यायामाने शरीर तर वाचनाने मन समृद्ध होते. – प्राचार्य डॉ शेकोकर.

सुकदर्शन वृतांत 
ब्रह्मपुरी – दि,१३/०८/२६(अमरदीप लोखंडे – सहसंपादक) ” ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ रंगनाथन यांनी ग्रंथांची नीट घडी घालून एक वेगळे शास्त्र जगाला दिले.ग्रंथ हे गुरु असून व्यायामाने जसे शरीर बलवान होते तसे ग्रंथ वाचनाने मन समृद्ध होते” असे विवेचन प्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी केले.ते डॉ रंगनाथन जयंतीनिमित्त कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगतात बोलत होते.
विचारपीठावर मराठी विभागप्रमुख कवी डॉ धनराज खानोरकर,ग्रंथालय समिती प्रभारी डॉ युवराज मेश्राम,ग्रंथालय प्रमुख सुषमा राऊत,दत्तू भागडकर विचारपीठावर उपस्थित होते.यावेळी डॉ खानोरकरांनी, जो ग्रंथ सहवासात येतो त्याच्या बुध्दीचा सुवास रातराणीच्या सुगंधासारखा दशदिशात जातो.वाचन जीवनाला दिशा देते.वाचनाची नशा समृद्ध करते,असे विचार मांडले तर डॉ मेश्रामांनी,ग्रंथ वाचनाने माणूस बलवान,शिलवान व बुध्दिमान बनतो आणि बुध्दिमान व्यक्ती इतिहास रचतो असे मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक डॉ.सुषमा राऊत,संचालन दत्तू भागडकर तर आभार शशिकांत माडेनी मानले.यशस्वीतेसाठी माणिक दुपारे,जितू मंडपे,निनावेंनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!