Thursday, August 13, 2026
Home Breaking News उत्पन्नाच्या तुलनेत लाखोंची अपसंपदा ; अव्वल कारकुन दाम्पत्यावर एसीबीचा गुन्हा..!

उत्पन्नाच्या तुलनेत लाखोंची अपसंपदा ; अव्वल कारकुन दाम्पत्यावर एसीबीचा गुन्हा..!

0
11

उत्पन्नाच्या तुलनेत लाखोंची अपसंपदा ; अव्वल कारकुन दाम्पत्यावर एसीबीचा गुन्हा..!

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली (दि.11) :- ज्ञात व वैध उत्पन्नाच्या तुलनेत तब्बल 49 लाख 62 हजार 512 रुपयांची अपसंपदा आढळून आल्याने कुरखेडा येथील तत्कालीन अव्वल कारकुन तथा सध्या आरमोरी तहसील कार्यालयात कार्यरत असलेले नागसेन प्रेमदास वैद्य यांच्यासह त्यांच्या पत्नी रजनी नागसेन वैद्य यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल केला आहे.
एसीबीच्या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.एसीबीच्या माहितीनुसार,नागसेन वैद्य हे कुरखेडा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात अव्वल कारकुन म्हणून कार्यरत असताना 1 सप्टेंबर 2013 ते 5 फेब्रुवारी 2024 या तपासणी कालावधीत त्यांनी त्यांच्या ज्ञात व वैध उत्पन्नाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात मालमत्ता संपादित केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या कालावधीत वैद्य यांच्याकडे 49 लाख 62 हजार 512 रुपयांची अपसंपदा आढळली असून, ही रक्कम त्यांच्या एकूण ज्ञात व वैध उत्पन्नाच्या 48.15 टक्के असल्याचे एसीबीने नमूद केले आहे. त्यामुळे उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांच्या तुलनेत ही मालमत्ता विसंगत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणी सरकारतर्फे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक किरण विठ्ठल बगाटे यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून 11 ऑगस्ट 2026 रोजी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
नागसेन वैद्य यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमातील संबंधित कलमांनुसार अपसंपदा बाळगल्याप्रकरणी,तर त्यांच्या पत्नी रजनी वैद्य यांच्याविरुद्ध सदर अपसंपदा धारण करण्यास सहाय्य केल्याच्या आरोपावरून कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!