Home Breaking News गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाचे वैद्यकीय उपचारांकरिता भामरागड येथून...
गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील नागरिकाचे वैद्यकीय उपचारांकरिता भामरागड येथून हेलिकॉप्टर च्या मदतीने तातडीने स्थलांतर.
सुकदर्शन वृतांत
भामरागड : (दि.31/07/2026 शुक्रवार) सविस्तर वृत्त असे आहे की,मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती, पामुलगौतम व पर्लकोटा नद्यांना आलेल्या पाण्यामुळे पुर परिस्थीती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्रातील अतिदुर्गम अशा भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे.
अशातच आज दिनांक 31 जुलै 2026 रोजी गडचिरोली जिल्ह्रातील उपविभाग भामरागड अंतर्गत मौजा लाहेरी येथील रहिवासी श्री. शामसुंदर नरोटी, वय 35 वर्ष यांची प्रकृती विषबाधा किंवा सर्पदंश कारणाने गंभीर झाल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस दल व जिल्हा प्रशासनाच्या मदतीने तात्काळ हालचाल करुन त्यांना योग्य आणि चांगल्या उपचारसाठी तातडीने गडचिरोली ला हलवण्याची व्यवस्था करण्यात आली.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीवरून श्री. शामसुंदर नरोटी यांना वैद्यकीय स्थलांतराची तात्काळ गरज लक्षात घेता, गडचिरोली पोलीसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागडसाठी रवाना करण्यात आले होते. श्री. शामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आले आहे, त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे.
पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी भामरागड परिसरातील नागरिकांना आवाहन केले की, आपत्कालीन परिस्थीतीत कुठल्याही अंधश्रध्देला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क करुन वेळेत उपचार मिळवावे.
सदर कार्यवाही ही गडचिरोली पोलिसांनी जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भामरागड, पोस्टे भामरागड येथील अधिकारी व कर्मचारी, भामरागड तालुक्यातील महसूल अधिकारी व कर्मचारी, पवन हंस पायलट श्री. अरविंद सैनी, राजीव शर्मा यांच्या सहकार्याने पार पाडली.
error: Content is protected !!