Monday, September 14, 2026
Home Chandrapur उपरी येथील माजी सरपंच आशिष मनबतूलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर...

उपरी येथील माजी सरपंच आशिष मनबतूलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर संपन्न.

उपरी येथील माजी सरपंच आशिष मनबतूलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर संपन्न.

सुकदर्शन वृतांत 
सावली : सावली तालुक्यातील उपरी येथील माजी सरपंच आशिष मनबतूलवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर घेण्यात आले .महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या परिस्थितीत रक्ताचा खूपच तुटवडा जाणवत आहे.आपणही सामाजिक आयुष्याचा एक भाग असल्याचे मनात विचार ठेवून उपरी येथील माजी सरपंच तथा सावली तालुका माजी युवक अध्यक्ष आशिष मनबतूलवार यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमीत्य उपरी येथे दिनांक ३० जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपरी तथा परिसरातील बऱ्याच युवकांनी रक्तदान केले.या रक्तदान शिबिर प्रसंगी व्याहाड बूज.येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरनुले,डॉ.पवन कवठे,विनोद भुरसे,स्वप्नील बोमनवार,दिपक कोठारे , दिलखुष सातपुते,डॉ.गोबाडे,गोविल गुरनुले,कृष्णा वाढई आणि उपरीचे माजी सरपंच आशिष मनबतूलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
error: Content is protected !!