Monday, September 14, 2026
Home Gadchiroli महावितरणचा प्रताप कुरूड येथील सामान्य ग्राहकाला तब्बल ४ लाख ७९ हजार रुपयांचे...

महावितरणचा प्रताप कुरूड येथील सामान्य ग्राहकाला तब्बल ४ लाख ७९ हजार रुपयांचे वीज बिल.

महावितरणचा प्रताप कुरूड येथील सामान्य ग्राहकाला तब्बल ४ लाख ७९ हजार रुपयांचे वीज बिल.

सुकदर्शन वृतांत 
देसाईगंज (वडसा) : एकीकडे स्मार्ट मीटरबद्दल ग्राहकांच्या तक्रारी वाढत असतानाच,आता देसाईगंज तालुक्यातील कुरूड येथील एका सामान्य ग्राहकाला महावितरणने चक्क ४ लाख ७९ हजार ६० रुपयांचे अवाढव्य वीज बिल पाठवून मोठा ” शॉक ” दिला आहे.
कुरूड येथील रहिवासी रामदास हरी ठाकरे यांना महावितरणकडून हे अवाढव्य बिल प्राप्त झाले आहे. एका सामान्य कुटुंबाच्या घरात ना ए.सी. आहे, ना कोणती मोठी यंत्रसामग्री, तरीही एवढ्या मोठ्या रक्कमेचे बिल आलेच कसे असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.हे बिल पाहून ठाकरे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.
हे बिल सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, ” सामान्य माणसाने घरात कारखाना चालवला का ? ” अशा उपरोधिक प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.
स्मार्ट मीटरच्या मोहिमेवर प्रश्नचिन्ह या धक्कादायक प्रकारामुळे देसाईगंज परिसरात महावितरणच्या कारभाराविरुद्ध संतापाची लाट उसळली आहे. या प्रकारामुळे जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
याबाबत देसाईगंजचे उपकार्यकारी अभियंता रूपेश मेश्राम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ” मीटर रीडरने चुकीचे रीडिंग पंच केल्यामुळे संबंधित ग्राहकाला चुकीचे बिल निर्गमित झाले होते.आता ते मीटर रीडिंगनुसार दुरुस्त करण्यात आले असून, ग्राहकाला नवीन सुधारित बिल देण्यात आले आहे,” असे त्यांनी सांगितले.
error: Content is protected !!