Friday, July 31, 2026
Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात नर वाघाचा संशयास्पद मृत्यू ; शवविच्छेदन पूर्ण,मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट.

चंद्रपूर जिल्ह्यात नर वाघाचा संशयास्पद मृत्यू ; शवविच्छेदन पूर्ण,मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट.

0
23

चंद्रपूर जिल्ह्यात नर वाघाचा संशयास्पद मृत्यू ; शवविच्छेदन पूर्ण,मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट.

सुकदर्शन वृतांत 
सावली : दि.30 जून 2026 चंद्रपूर वनविभागाच्या सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या चिकली चक क्र.02 (ता.मूल) येथील बिगर वनक्षेत्रात सुमारे 6 ते 7 वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मंगळवारी दुपारी सुमारे 1:00.वा.च्या सुमारास ही घटना निदर्शनास आली.
वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हे क्रमांक.78, बिट – चितेगाव,राऊंड – राजोली,परिक्षेत्र – सावली येथील बिगर वनक्षेत्रात वाघाचा मृतदेह आढळला. प्राथमिक अंदाजानुसार, वाघाचा मृत्यू सुमारे एक दिवसापूर्वी झाला असावा.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे,सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, WPSI चे प्रतिनिधी मुकेश भांदककर, Eco Pro चे प्रतिनिधी राजू काहीलकर,तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विलास गव्हखरे,डॉ.कुंदन पोडचेलवार,डॉ.आकाश गोमकाळे,चंद्रपूर वनविभागाचे बायोलॉजिस्ट अक्षय नारनवरे आणि नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अथॉरिटी (NTCA) च्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
तपासणीदरम्यान वाघाचे सर्व अवयव सुरक्षित व सुस्थितीत असल्याचे आढळून आले असून, शिकारीचा कोणताही प्राथमिक पुरावा आढळलेला नाही. त्यानंतर राजोली रोपवाटिकेत वाघाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.
वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवाल आणि इतर नमुन्यांच्या तपासणीनंतरच अंतिम निष्कर्ष समोर येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!