Home Chandrapur राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा.महेश पानसे
राज्य पत्रकार संघ राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी प्रा.महेश पानसे
सुकदर्शन वृतांत
मुल : (राजेंद्र वाढई – उपसंपादक) महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य व सर्वात मोठ्या पत्रकार संघ असलेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी जेष्ट पत्रकार,विश्लेषक व संघाचे जेष्ट पदाधिकारी प्रा.महेश पानसे यांची राज्य अध्यक्ष (निवड समिती) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.गत दोन वर्षापासून संघटनेचे राज्य उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.
संघटनेचे राज्य अध्यक्ष निलेश सोमानी,राज्य संघटक संजयजी भोकरे यांच्या सुचनेनुसार राज्य सरचिटणीस डॉ.विश्र्वासराव आरोटे यांनी प्रा.महेश पानसे यांच्या नियुक्तीचे आदेश निगॅमीत केले आहे.जेष्ट पत्रकार प्रा.महेश पानसे यांनी राज्य पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पद, नागपूर विभाग अध्यक्ष पद, विदर्भ अध्यक्षपद, राज्य उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळून आपले संघटन कौशल्य दाखवून दिले आहे.30 वर्षापासून अनेक अग्रगण्य वर्तमान पत्रांमधून पत्रकारीता सिद्ध केली आहे.
गत 15 वर्षापासून राज्य पत्रकार संघात काम करताना संपूर्ण विदर्भ प्रदेशात संघटनेची व्याप्ती झपाट्याने वाढविण्यात प्रा.महेश पानसे यांचे मोठे योगदान राहिले आहे.त्याच्या नेतृत्वाखाली चिमूर,ब्रम्हपूरी,नागपूर येथे पत्रकारांचे भव्य राज्य अधिवेशन सफल झाली.
आहेत हे विशेष.पत्रकारीता व पत्रकार संघटन यातून विदभाॅतील शेकडो तरुणांना पत्रकारितेच्या क्षेत्रात पुढे आणण्यात प्रा. महेश पानसे यांचा मोठा वाटा राहीला आहे.प्रा.महेश पानसे यांच्या राज्य अध्यक्ष ( निवड समिती) पदी नियुक्ती झाल्याबद्दल संघटनेचे राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!