Thursday, July 30, 2026
Home Chandrapur संशोधनासाठी सातत्यपूर्ण परिश्रम घेणे गरजेचे. – प्राचार्य डॉ.आरेकर

संशोधनासाठी सातत्यपूर्ण परिश्रम घेणे गरजेचे. – प्राचार्य डॉ.आरेकर

0
10

संशोधनासाठी सातत्यपूर्ण परिश्रम घेणे गरजेचे. – प्राचार्य डॉ.आरेकर

सुकदर्शन वृतांत 
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) ” संशोधनप्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून साहित्यावरचे संशोधन हे बारकाईने व काळजीपूर्वक करावे लागते.प्रबंधलेखनात योग्य संदर्भ देऊन त्यावरचे आपले चिंतन मांडणे महत्वाचे असते.या गंभीर व जटील प्रक्रियाला सामोरे जातांना सातत्यपूर्ण परिश्रमाची गरज असते.
” असे विवेचन मोहनसिनभाई झवेरी विज्ञान महाविद्यालय,वडसाचे प्राचार्य डॉ नरेंद्र आरेकरांनी केले.ते येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात मराठी संशोधन केंद्र आयोजित सहामाही प्रगती अहवाल व सत्कार सोहळयात बोलत होते.
विचारपीठावर प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर अध्यक्षस्थानी होते तर विभागप्रमुख डॉ धनराज खानोरकर, डॉ प्रकाश वट्टी, डॉ पद्माकर वानखडे,डॉ मोहन कापगते यावेळी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे औचित्य साधून नूतन प्राचार्य डॉ.आरेकरांचा महाविद्यालया तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक डॉ.खानोरकर,संचालन डॉ.वानखडे तर आभार डॉ.वट्टीनी मानले.कार्यक्रमाला डॉ.भास्कर लेनगुरे, डॉ.राजू आदे तर मराठी संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!