Monday, September 14, 2026
Home Gadchiroli झाडीपट्टी नाट्यभूमी जिवंत राहिली पाहिजे; कलाकारांच्या मानधनात वाढ व्हावी. – महेंद्र ब्राह्मणवाडे

झाडीपट्टी नाट्यभूमी जिवंत राहिली पाहिजे; कलाकारांच्या मानधनात वाढ व्हावी. – महेंद्र ब्राह्मणवाडे

झाडीपट्टी नाट्यभूमी जिवंत राहिली पाहिजे; कलाकारांच्या मानधनात वाढ व्हावी. – महेंद्र ब्राह्मणवाडे

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा असून या रंगभूमीने अनेक दर्जेदार कलाकार घडवून त्यांना चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचविले आहे.आजही हजारो कलाकार व त्यांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह झाडीपट्टी नाट्यकलेवर अवलंबून आहे.
त्यामुळे ही नाट्यभूमी जिवंत राहणे अत्यंत आवश्यक असून झाडीपट्टीतील कलाकारांना मिळणाऱ्या मानधनात शासनाने वाढ करावी,असे मत जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले.
ओम शिव ओम साई कला रंगभूमीद्वारे संचालित वेदांत नाट्यकला मंच प्रस्तुत ” लग्नपाठ ” या नाटकाच्या विमोचन सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
 यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी यांच्या सह धानोरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत कोराम,जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अनिल कोठारे, दिवाकर निसार,ढिवरू मेश्राम,जावेद खान, नाट्यलेखक पुंडलिक भांडेकर,तसेच कलाकार के. रविकुमार,प्रभाकर गडपायले,राज बोबाटे
प्रशांत चुधरी,करण मंगमोडे, प्रफुल भरडकर, किशोर कापगते, प्रफुल किलनाके आणि महिला कलाकार लता निंदेकर, सुप्रिया मोटघरे, अश्विनी व रेश्मा रंभाळ यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते.
error: Content is protected !!