Friday, July 31, 2026
Home Breaking News चंद्रपूर शहरालगत च्या पडोली येथे 5 वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेट देण्याचं आमिष देऊन...

चंद्रपूर शहरालगत च्या पडोली येथे 5 वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेट देण्याचं आमिष देऊन फ्लॅटमध्ये अत्याचाराचा प्रयत्न.

0
26

चंद्रपूर शहरालगत च्या पडोली येथे 5 वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेट देण्याचं आमिष देऊन फ्लॅटमध्ये अत्याचाराचा प्रयत्न.

सुकदर्शन वृतांत 
चंद्रपूर : चंद्रपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चंद्रपूर शहरालगतच्या पडोली पोलीस ठाणे हद्दीत एका ५ वर्षांच्या चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या नराधमाने चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःच्या सदनिकेत अत्याचाराचा प्रयत्न केला.हा नराधम अजित पवार गटाचा माजी विधानसभा प्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरालगतच्या पडोली पोलीस ठाणे हद्दीत चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आलाय.शेजारी राहणारी 5 वर्षीय चिमुकली घरी आल्यावर तिला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःच्या सदनिकेत अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आला.
पण, या चिमुरडीसोबत असलेल्या वयाने मोठ्या बहिणीने या विकृताच्या घरातून पळ काढला आणि घरं गाठलं. त्यानंतर तिने ही घटना कुटुंबियांना सांगितली.त्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बल्लारपूर क्षेत्राचा माजी विधानसभा प्रमुख असल्याची माहिती पुढे आली आहे.
पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य बघता तातडीने कारवाई करत आरोपी ओंकार गेडाम वय,64 वर्ष याला ताब्यात घेतलं आहे.पोलिसांची गुन्हे अन्वेषण पथक,फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत अशा मानसिकतेच्या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.पडोली पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!