Thursday, July 30, 2026
Home Chandrapur शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाची उज्ज्वल कामगिरी ; तनया बुरांडे मूल...

शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाची उज्ज्वल कामगिरी ; तनया बुरांडे मूल तालुक्यात प्रथम.

0
11

शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाची उज्ज्वल कामगिरी ; तनया बुरांडे मूल तालुक्यात प्रथम.

सुकदर्शन वृतांत 
मुल : (राजेंद्र वाढई – उपसंपादक)चिरोली शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय, चिरोली येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या परीक्षेत विद्यालयातील तनया श्रीकांत बुरांडे हिने ८२.०० टक्के गुणांसह मूल तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळविले.
तसेच संस्कृती राकेश भीमनवार (८०.००%), सावित्री योगराज वाढई (७९.३३%), सावन वनपाल कुळमेथे (७८.६६%), संजीवनी संतोष मोहुर्ले (७५.३३%), मनश्री राजेंद्र बोबाटे (६८.००%), स्वरा विपुल तावाडे (६६.६६%), ईश्वरी देवनाथ जुमनाके (६३.३३%), शिरीष आशिष बरेवार (६०.६७%), शौर्य मुकुंदा गुरनुले (५७.३३%), नव्या गजानन लेनगुरे (५४.६६%) आणि संघर्ष संजय कस्तुरे (५२.००%) यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल विनोद शिक्षण संस्था, गोसे (बूज) यांच्या अध्यक्षा श्रीमती पारबता राजेशजी डोंगरे, सचिव श्री गंगाधर नथुजी डोंगरे, जनरल सेक्रेटरी तथा प्राचार्य मा. श्री चेतक राजेशजी डोंगरे, शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री परमानंद ए. सेलोकर, ज्येष्ठ शिक्षक श्री आर. एस. गरमाडे, श्री व्ही. डी. डोर्लीकर, श्री एन. डी. नाकाडे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
संस्थेच्या व शाळेच्या वतीने मुख्याध्यापक मा. श्री परमानंद ए. सेलोकर यांच्या हस्ते सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच मार्गदर्शक शिक्षक श्री ए. एस. मेश्राम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांना देत भविष्यातही अधिक मेहनत घेण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!