Home Gadchiroli प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कार्यशाळेचे व कृषी ताई यांचे एक दिवसीय...
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कार्यशाळेचे व कृषी ताई यांचे एक दिवसीय प्रशिक्षण आयोजन.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : तालुका कृषी अधिकारी गडचिरोली च्या वतीने ” प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कार्यशाळा व नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ” अंतर्गत कृषी ताई यांचे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम मौजा कृषी चिकिस्तालय सोनापूर/गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यशाळेचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी मा.धर्मेंद्र गिरीपुंजे यांनी केले.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना हा केंद्र सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हा प्रकल्प राबवून शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभारणी करून आपल्या शेत मालाचे मूल्य वाढविण्याचे आवाहन यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी धर्मेंद्र गिरेपुंजे यांनी केले.
तद्वतच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध घटकांचा लाभ शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन कृषी ताई यांना केले. या योजनेअंतर्गत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन गाव पातळीवर विविध शेतीपूरक युनिट उभारणा करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी कु. सुप्रिया कलंबरकर यांनी प्रास्ताविकेतून केले.
प्रकल्पाचे जिल्हा समन्वयक आकाश भुरसे यांनी योजनेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.मंडळ कृषी अधिकारी निशांत सोनटक्के यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना बद्दल व अर्ज कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कृषी ताई शीतल हरडे, अर्पिता वड्डे, आणि बॉबीताई चनेकार यांचे सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन उपकृषी अधिकारी सुनील बुद्धे, तर आभारप्रदर्शन उप कृषी अधिकारी व्ही. एस. हारगुळे यांनी केले. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी किशोर भैसारे, विलास खोब्रागडे
सचिद्र आत्राम,दिनेश रामटेके शुभम पेंदाम, सुरत सातपुते, मुकुल कावळे,कु मयुरी करंगामी,कु.तेजश्री पाटेकर,कु.पल्लवी आतला,DRP महेंद्र मशाखेत्री व बहुसंख्य कृषिताई व तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्तित होते.
error: Content is protected !!