Monday, September 14, 2026
Home Chandrapur अल्पवयीन मुलीला समाजमाध्यमांवरून जाळ्यात ओढत तिच्या लैंगिक शोषण बळजबरीने धर्मांतरण आरोपाखाली  चंद्रपुरातील...

अल्पवयीन मुलीला समाजमाध्यमांवरून जाळ्यात ओढत तिच्या लैंगिक शोषण बळजबरीने धर्मांतरण आरोपाखाली  चंद्रपुरातील तरुणाला केली अटक

अल्पवयीन मुलीला समाजमाध्यमांवरून जाळ्यात ओढत तिच्या लैंगिक शोषण बळजबरीने धर्मांतरण आरोपाखाली  चंद्रपुरातील तरुणाला केली अटक

सुकदर्शन वृतांत 
चंद्रपूर : हुडकेश्वर पोलीस हद्दीत शासकीय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलीला समाजमाध्यमांवरून जाळ्यात ओढत तिच्या लैंगिक शोषणाची घटना ताजी आहे.त्याचा पोलीस तपासही अद्याप पूर्ण झालेला नाही. तोच पुनरावृत्ती झाली.
नागपुरातील 11 वर्षीय शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे बळजबरीने धर्मांतरण करण्याच्या आरोपाखाली पोलिसांनी चंद्रपुरातील एका तरुणाला अटक केली आहे.यातील आणखी संपाजनक बाब म्हणजे विक्षिप्त तरुणाने तिच्याशी इंस्ट्राग्रामवरून केलेले अश्लिल संभाषण आणि व्हिडिओ कॉल समाजमाध्यमांवर व्हायरल केले.
इयत्ता सहाव्या वर्गात शिकणाऱ्या पिडीत मुलीने मैत्रिणीच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर खाते तयार केले.यावर तिला अंकित संपत देवगडे वय,24 वर्ष चंद्रपूर  तरुणाने विनंती पाठवली.
संभाषणादरम्यान अंकितने मुलीशी अश्लील संदेश पाठवले. त्याने मुलीशी धार्मिक विषयांवरही संभाषण केले. त्यानंतर तिच्यावर धर्मांतर करून लग्न करण्यासाठी दबाव टाकला,असा आरोप आहे.
आरोपीने दुसऱ्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून मुलीला कथितरीत्या अश्लील भाषेतील संदेश आणि अश्‍लील रील्स पाठवले.या व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग इन्स्टाग्रामवर अपलोड केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पोलिसांनी अंकित देवगडेविरुद्ध पोक्सो कायद्यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
या प्रकरणात मुलीच्या नावाने कथित बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केल्याचीही तक्रार आहे. या खात्यावर धार्मिक स्वरूपाच्या पोस्ट टाकण्यात आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मुलीच्या आईने जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार केली.
त्या आधारे पोलिसांनी कथित इन्स्टाग्राम खाते,चॅट, व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग आणि इतर डिजिटल पुरावे तपासले. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास करण्यात येत असून,तपासात आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
error: Content is protected !!