Monday, September 14, 2026
Home Breaking News सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्र केरोडा परिसरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी 

सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्र केरोडा परिसरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी 

सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्र केरोडा परिसरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी 

सुकदर्शन वृतांत 
सावली : दिनांक 26/8/2026 बुधवार रोजी 12: 30 वा.व्याहाड खुर्द उपवन परिक्षेत्र अंतर्गत केरोडा येथील श्री.नामदेव किसन कुकडे वय,65 वर्ष हे दररोज प्रमाणे आपल्या बकऱ्या घेऊन 280 गट क्रमांक जंगल व शेत परिसरात बकऱ्या राखत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून गुराख्याला जखमी केले.
गुरख्यांनी जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी नेताना सुरक्षीता बाळगावी सामदा/पेठगाव,सोनापूर,व्याहाड (बुज),केरोडा,जांब (बुज), कोंडेखल,वाघोली परिसरातील गुराखी,बकऱ्या चारणारे तसेच गावकऱ्यांना सूचीत करण्यात आले.
शेतात अथवा जंगलात कोणत्याही कामानिमित्य जात असल्यास खबरदारीने जावे व आपल्या जीवाची काळजी घ्यावी असे वनविभाचे कर्मचारी नागरिकांना सूचना दिल्या असुन सदर घटना वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहीत होताच घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. 
जखमी गुराख्याला गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि उपचार सुरू आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे,उपवन परिक्षेत्र अधिकारी मारोती पूल्लेवाड, डी.एस.शेडमाके वनरक्षक सामदा,डांगे,खुळे वनरक्षक कर्मचारीआदी उपस्थित होते.
error: Content is protected !!