Friday, July 31, 2026
Home Gadchiroli जारावंडी येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी.

जारावंडी येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी.

0
17

जारावंडी येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी.

सुकदर्शन वृतांत
एटापल्ली : आरक्षणाचे जनक, सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य समर्पित करणारे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती ग्रामपंचायत जारावंडी येथे मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत जारावंडीच्या सरपंच सौ.सपना ताई कोडापे या होत्या.तर उपाध्यक्ष म्हणून उपसरपंच सुधाकरजी टेकाम यांनी उपस्थिती दर्शविली. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसुदेवजी कोडापे उपस्थित होते.
यावेळी हरिदास टेकाम (माजी सरपंच), घनश्याम नाईक (माजी सरपंच, भापडा), जनकशहा नाहमुर्ते (पोलीस पाटील,जारावंडी) दयाराम सिडाम,मुकेश कावळे,रमेश दुग्गा (उपसरपंच, सारखेडा),सोबराज उसेंडी (सारखेडा), रमजान पठाण, संदीप येनगंटीवार, कालिदास गेडाम,मनिराम सडमेक
सुमित करमरकर,बिकटोर कुल्लू, उत्तम मडावी, दामाजी मडावी, सर्जन मडावी, मनोज झुरी (हनपायली), लक्षुराम दुग्गा (कुरुमवाडा), गणेश कुमरे (दोलांदा) यांच्यासह परिसरातील विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराजांचे शिक्षण, सामाजिक समता, आरक्षण, बहुजन कल्याण आणि लोकहितवादी कार्य यावर प्रकाश टाकत त्यांच्या विचारांचा समाजाने अंगीकार करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन कालिदास गेडाम यांनी केले.तर उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व नागरिकांचे संदीप येनगंटीवार यांनी आभार मानले.
राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करून सामाजिक समता, शिक्षण आणि संविधानिक मूल्यांचा संदेश देणारा हा जयंती सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!